कडलास येथील श्रीमती अनुराधा पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार
सांगोला -सोलापूर येथे अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने यावतीने राज्यस्तरीय जिजाऊ पुरस्कार 2023 हा पुरस्कार सामाजिक व शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामास प्रोत्साहन मिळावे या उद्देशातून अविष्कार फाउंडेशन यांनी हे पुरस्कार दिले आहेत . अनुराधा पाटील यांच्या संस्थेस या अगोदर सीबीएस न्यूज मराठी यांच्यावतीने उत्कृष्ट संस्था तसेच त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय ,राष्ट्रीय असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांनी केलेल्या शैक्षणिक योगदानामुळे त्यांना वरील पुरस्कार मिळाला.
श्रीमती अनुराधा पाटील या मूळच्या कडलास येथील रहिवासी असून त्यांच्या पतीच्या आकस्मित निधनानंतरही त्यांनी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारत आपल्या संस्थेचे कार्य तसेच आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण देऊन व योग्य मार्गदर्शन करून त्यांचा एक मुलगा उद्योजक आहे व एक प्रगतशील बागायतदार आहे .तसेच कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडत त्यांनी सामाजिक व राजकीय कार्य करत असताना कडलास गावच्या त्या सरपंच होत्या ,तसेच त्यांनी गावातील महिलांना एकत्र करून बचत गटाचे महत्व प्रथम गावातील महिलांना समजावून सांगून गावात अनेक बचत गट तयार कले .त्यांना उद्योजक बनवण्याचे कार्य केलं व त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली. यासाठी सांगोला येथील माता बालक प्रतिष्ठानची त्यांना मदत सुरुवातीच्या काळात झाली होती .
तसेच त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या सहकार्यातून व त्यांच्या संस्थेतील सर्वच पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापिका व सर्व स्टाफ यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित केले दिनांक 19 मार्च 2023 रोजी सोलापूर येथे हिराचंद नेमचंद वाचनालय या ठिकाणी त्यांचा सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन कार्यक्रम झाला.