वृक्षारोपण करुन साजरा केला वाढदिवस.
सरदार शामराव लिगाडे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अकोला वासुद येथे इयत्ता सातवी मधील शिक्षण घेत असलेली सुभेदार भिमराव सावंत यांची नात व सहायक कृषी अधिकारी बाळासाहेब सावंत यांची कन्या वैष्णवी हिचा वाढदिवस शालेय प्रांगणात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला
सध्या नवीन पिढी मोठमोठाले डिजे , फटाके, जेवणाच्या पंगती आदि द्वारे पैशाची उधळपट्टी करून ध्वनी प्रदुषण पर्यावरण प्रदुषणाद्वारे वाढदिवस साजरा करीत आहे.
वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे …विविध प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वनस्पती, पिके आपल्याला अन्नधान्य, फळे, भाज्या देतात. औषधी वनस्पती, कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगांवर उपाय होतो.. भावी पिढीला शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व समजावे व एक सामाजिक संदेश प्राप्त व्हावा ह्यासाठी वासुद येथील वैष्णवी सावंत हिचा वाढदिवस शालेय व्यवस्थापन व तिचे वडिल सहायक कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब सावंत यांनी शालेय प्रांगणात औषधी व मसाला वनस्पतींची लागवड करुन साजरा केला.
प्राचार्च श्री. कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुपरवायझर श्री. पवार सर, श्री. झिरपे सर,श्री. कडव सर, श्री. घोरपडे सर, श्री. मोटकुळे सर, श्री. पाडवी सर , श्री. मुजावर सर, श्री. कोळेकर सर, मंथन बुक डेपोचे श्री समाधान केदार तसेच विदयार्थी पालक यांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.
ह्या कार्यक्रमात सांगोला तालुक्यातील सुप्रसिद्ध मंथन बुक डेपोचे श्री. समाधान केदार यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना पाणी बॉटल चे ही वाटप करण्यात आले.