सांगोला नगरपालिकेच्या विविध विकास कामांकरिता ५ कोटी रुपये मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

नवीन मटन मार्केटसाठी दीड कोटी तर विद्युत शवदाहिनीसाठी एक कोटी रुपये मंजूर
सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांकरिता महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून पाच कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली यामध्ये प्रामुख्याने १) मटन मार्केट फेज २ साठी दीड कोटी २) हिंदू स्मशानभूमी येथे विद्युत शवदाहिनीसाठी बसविणे १ कोटी ३) मिरज रोड देविदास बाबर घर ते फिरोज शेख घर ते ओढ्यापर्यंत आरसीसी पाईप गटार करणे ११ लाख ४) बनकर वस्ती येथे भीमराव बनकर घर ते सैफन बागवान मळा ते संजय बनकर घर ते अक्षय जावीर घर ते माने प्लॉटपर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३० लाख ५) आरक्षण क्र २४ येथील चौक सुशोभीकरण करणे १६ लाख ६) चिंचोली रोड स. न. ५१५ ते पूर्वेस फॅबटेक कॉलेज कडे जाणारा ९.०० मी रुंदीचा डीपी रस्ता करणे ७३ लाख ७) सांगोला नगरपरिषद मालकीचा कचरा डेपो येथील अंतर्गत रस्ते करणे ५० लाख ८) वाढेगाव रोड पाण्याच्या टाकीस चौकीदार निवास बांधणे व पेव्हिंग ब्लॉक बसवणे २५ लाख ९) पंढरपूर रोड पाण्याच्या टाकीस चौकीदार निवास बांधणे व पेव्हिंग ब्लॉक बसवणे २५ लाख १०) नवीन जलशुद्धीकरण केंद्र येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे १०लाख ११) जुने जलशुद्धीकरण केंद्र येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे १० लाख असे एकूण पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून सांगोला नगरपालिकेसाठी आतापर्यंत सुमारे 60 ते 70 कोटी रुपयांचा निधी दीड मागील वर्षामध्ये मिळाला असून यामध्ये शहरातील अनेक विकास कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. या पुढील काळातही शहरातील भुयारी गटारीसह अनेक विकासकामांना भरघोस निधी मिळणार असून सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदलविणार असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.