राजकीयसांगोला तालुका

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून २५/१५ योजनेअंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी विविध गावातील विकास कामांना ७ कोटी रुपये मंजूर -आमदार शहाजीबापू पाटील

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातुन सांगोला विधानसभा मतदार संघासाठी गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे साठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून लेखाशिर्ष २५१५ अंतर्गत ७ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
             सांगोला विधानसभा
 मतदारसंघातील विविध गावातील गावांतर्गत रस्ते रस्तावरील ओढ्यावरील पुल, सभामंडप कामे, स्मशानभूमी दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक अशी विविध प्रकारची कामे यामधून होणार असल्याने ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होणार आहे व ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे होणार आहे
 या सर्व कामांचे अंदाजपत्रके तयार करण्याचे काम चालू असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करण्यात येतील असे यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!