किरण अकॅडमी, पुणे या कंपनीमध्ये सांगोला महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची निवड

सांगोला / प्रतिनिधी: दिनांक 28 मार्च 2023 रोजी सांगोला महाविद्यालय सांगोला येथे किरण अकॅडमी,पुणे या कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सांगोला महाविद्यालयाच्या संगणक विभागातील सात विद्यार्थ्यांची निवड झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
किरण अकॅडमी, पुणे ही पुणे येथील सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणार्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणारी एक नामांकित कंपनी आहे. सदर कंपनीत निवड झालेले विद्यार्थी हे बी.एस्सी. (ई.सी.एस.) व बी.सी.ए. च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. चालू शैक्षणिक वर्षात या अगोदरही वेगवेगळ्या नामांकित कंपन्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सांगोला महाविद्यालय हे संगणक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे महाराष्ट्रातील एक अग्रेसर महाविद्यालय आहे.
सदर कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहे. कु. भुसे प्रतिक्षा प्रभाकर, कु. दिवसे ऋतुजा दत्तात्रय, कु. रणदिवे ऋतुजा धनाजी, श्री. सुरवसे रोहन राजू, श्री. घाडगे विवेक अशोक, कु. जाधव स्वप्नाली शिवाजी, श्री. गाडेकर प्रकाश महादेव सदर
प्लेसमेंट ड्राईव्ह प्रक्रिया पार पाडण्यासाठी कंपनीच्या वतीने श्री. पंकज येरपुडे (ऑपरेशन हेड), श्री अण्णासाहेब भोसले( मार्केटिंग हेड) हे उपस्थित होते. संपूर्ण कॅम्पस निवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी संगणक विभागप्रमुख प्रा. राजकुमार ताठे, प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा.सूर्यकांत पाटील, प्रा विशाल कुलकर्णी, प्रा. कृष्णा पवार, प्रा. गणेश पैलवान, प्रा. सुभाष पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष मा.श्री.तात्यासाहेब केदार व मा.श्री.प्रा.पी.सी. झपके, खजिनदार मा.श्री. नागेश गुळमिरे सचिव मा.श्री. म.सि. झिरपे, सहसचिव मा. श्री. साहेबराव ढेकळे व इतर संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.