सांगोला तालुका

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्वाचं योगदान – चेतनसिंह केदार- सावंत ; भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने सांगोल्यात सावरकर गौरव यात्रा

सांगोला (तालुका प्रतिनिधी): देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सांगोल्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. वारंवार सावरकरांचा होणारा अपमान लक्षात घेता स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचा त्याग, देशाप्रती असलेले समर्पण नव्याने लक्षात घेण्याची गरज आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्वाचं योगदान असल्याचे मत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.

 

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्या विरोधात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने सांगोल्यात  सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे उद्घाटन भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाचं योगदान दिलं आहे. त्यासाठी त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, महात्मा फुले, स्वा. सावरकर यांच्यासह ज्ञात अज्ञात देशभक्तांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. हे सर्वजण स्वातंत्र्यवीर आहेत. मात्र, देशासाठी ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा अपमान जाणीवपूर्वक केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, शिवाजीराव गायकवाड, राजश्री नागणे, मानस कमलापूरकर, विजय बाबर, नागेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी माजी सभापती संभाजी आलदर, आनंद फाटे,दुर्योधन हिप्परकर,विलास व्हणमाने,शिवाजी आलदार, बाळाप्पा येलपले, लक्ष्मण येलपले, डॉ.कांबळे, मानस कमलापूरकर, उपसरपंच अनिल उर्फ बंडू केदार, सोयजित केदार, प्रवीण जानकर,अनिल वाघमोडे, गणेश घाडगे, राहुल केदार, दिलीप सावंत, उत्तम चौगुले, नरेश बाबर, वसंत सुपेकर, दीपक केदार, सौ. मनिषा आलदर्, लक्ष्मीकांत लिगाडे, गणेश घाडगे, पपू पाटील, भाऊ पाटील,शरद पवार,दीपक केदार, समाधान भालके,ओंकार कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!