सांगोला तालुकाराजकीय

भाजपचा ४३वा वर्धापन दीन सांगोल्यात साजरा

सांगोला: (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचा 43 वा वर्धापन दिन सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप कार्यालय वाढेगाव नाका, सांगोला येथे मोठ्या उत्साहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करून भारतमाता,पंडित दीनदयाळ उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी आदींच्या प्रतिमेचे पूजन तालुकाध्यक्ष चेतनसिंह(बाळासाहेब) केदार- सावंत यांचे हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते नागेश जोशी, वसंतराव सुपेकर , माजी सैनिक उत्तम चौगुले, कॅप्टन रावसाहेब साळुंखे, मेजर नरेश बाबर आदींचा सत्कार तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार – सावंत, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, जिल्हा सचिव आनंद फाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
      भाजपचा आज स्थापना दिवस असल्याने गेल्या 43 वर्षात देशात व राज्यात पक्ष संघटन मजबूत करून देशातील व राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कसोशीने  प्रयत्न करून बलशाही राष्ट्र साकार करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना धन्यवाद देण्यात आला.यावेळी भाजपच्या वाढीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचाही  गौरव करून त्यांचे  विशेष आभार मानण्यात आले. तसेच भाजपचे विचार ध्येयधोरण सांगोला तालुका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याची ग्वाही यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार – सावंत यांनी दिली.
या कार्यक्रमास भाजप किसान प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव गायकवाड,अनिल वाघमोडे,प्रवीण जानकर,संजय गव्हाणे, मानस कमलापुरकर, लक्ष्मीकांत लिगाडे, ओंकार कुलकर्णी,प्रसाद फुले,अमित पोरे, बाळासो चव्हाण, रोहित सावंत, विनोद उबाळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा आभार समारोप डॉ.मानस कमलापुरकर यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!