सांगोला तालुका

सांगोला येथे शनिवारपासून राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनास प्रारंभ

सांगोला(प्रतिनिधी):- राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनास शनिवार दि.8 एप्रिल 2023 पासून ग.दि.माडगुळकर साहित्य नगरी, सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे प्रारंभ होत असल्याची माहिती संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष श्री.बाबुराव गायकवाड यांनी दिली. संमेलनाध्यक्ष म्हणून श्री.इंद्रजित भालेराव तर स्वागताध्यक्ष म्हणून आ.शहाजीबापू पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

बुधवार दि.5 एप्रिल रोजी राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनासंदर्भात हॅपी पार्क येथे पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती.यावेळी संमेलन संयोजन समितीचे सचिव श्री.दादासाहेब रोंगे, सहसचिव अ‍ॅड.उदयबापू घोंगडे, सदस्य चेतनसिंह केदार उपस्थित होते. यावेळी तीन दिवस चालणार्‍या साहित्य संमेलनाविषयी संपूर्ण माहिती सांगण्यात आली.
शनिवार दि.8 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 11.30 यावेळेत ग्रंथदिंडी आयोजीत करण्यात आली होती. उद्घाटक म्हणून आ.समाधानदादा अवताडे उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.प्रबुध्दचंद्र झपके सर व अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ सांस्कृतिक कार्य.मंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंद्रजित भालेराव उपस्थित राहणार असून यावेळी खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील, आ.समाधान आवताडे, मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, मा.आ.प्रशांतराव परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब समिंदर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 1 ते 2 यावेळी चंदाताई तिवारी व सहकारी यांचा भारुड कार्यक्रम होणार असून यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील, मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.दुपारी 2 ते 4 यावेळेत लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थान यशवंत पाटणे भूषविणार असून तुकाराम धांडे, नीलम माणगावे यांचा सहभाग असणार असून संवादक म्हणून प्रा.धनाजी चव्हाण काम पाहणार आहेत. संध्याकाळी 4 ते 7 यावळे कवी संमेलन 1 होणार आहे. अध्यक्षस्थान डॉ.राजेंद्र दास भूषविणार असून सूत्रसंचालन सुनील जवंजाळ करणार आहेत. यावेळी गोविंद काळे, शिवाजी सातपुते, सुर्याजी भोसले, कविता म्हेत्रे, मेघा पाटील, पुष्पलता मिसाळ, लवकुमार मुळे, शिवाजी बंडगर, मच्छिंद्र ऐनापुरे, ज्ञानेश डोंगरे, विजय शिंदे, सुनील दबडे, रमेश जावीर, लक्ष्मण हेंबाडे, महादेव कांबळे, प्रेमकुमार वाघमारे, अरुण नवले, अशोक पवार यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी 7 ते 10 वाजता लोककला रजनी कार्यक्रम होणार आहे. यावेळी सुभाष गोरे आणि सहकारी यांचा जागरण गोंधळ, शाहीर पोपट घोगरे व सहकारी यांचा धनगरी ओव्या, मेघाश्री व गणेश महिंद्रकर यांचा महाराष्ट्राची शान कार्यक्रम होणार आहे. याचे उद्घाटन अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती पो.नि.अनंत कुलकर्णी यांची लाभणार आहे.
संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी रविवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत संत साहित्य व समाज परिवर्तन याविषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थान ह.भ.प.जयवंत बोधले महाराज भुषविणार आहेत. यावेळी ह.भ.प.श्यामसुंदर सोन्नर महाराज, ह.भ.प.देवदत्त परुळेकर, ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांचा सहभाग असणार आहे.संवादक म्हणून ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर हे काम पाहणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता कथाकथन होणार असून आप्पासाहेब खोत, ज्योतीराम फडतरे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 1 ते 2 यावेळेत डॉ.कृष्णा इंगोले यांची मुलाखत होणार असून सुभाष कवडे, अ‍ॅड.गजानन भाकरे मुलाखतकार असणार आहेत.दुपारी 2 ते 4 यावेळेत माणदेश स्वरुप आणि साहित्य या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थान डॉ.अविनाश सांगोलेकर भूषविणार आहेत. यावेळी बाबुराव गायकवाड, डॉ.सयाजीराव मोकाशी, डॉ.अरुण शिंदे यांचा सहभाग असणार असून डॉ.यशपाल खेडकर संवादक असणार आहेत.सायंकाळी 4 ते 7 यावेळेत कवी संमेलन 2 होणार आहे. अध्यक्षस्थान अरुण म्हात्रे असणार असून सूत्रधार डॉ.सुरेश शिंदे असणार आहेत. यावेळी प्रकाश होळकर, संदीप जगताप, विष्णू थोरे, आनंद लोकरे, अरुण पवार, नारायण पुरी, अनिल दिक्षित, स्वाती शिंदे-पवार, जितेंद्र लाड, विजया टाळकुटे,राधिका फराटे, हणमंत चांदगुडे, विजय जाधव, राजेंद्र वाघ, महेश मोरे, नितीन वरणकर आदी सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 ते 10 यावेळेत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी जयवंत रणदिवे व युवा शाहीर डॉ.अमोल रणदिवे सहकारी यांच्या भेदीक शाहिरी होणार आहेत. यावेळी उदय साटम व सहकारी यांचा मायमराठी कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनाच्या तिसर्‍या व अखेर दिवशी सकाळी 9.30 ते 11.30 वाजेपर्यंत शेतकर्‍यांचे प्रश्न आणि साहित्य याविषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थान डॉ.महेश कदम भूषविणार असून दत्ता घोलप, रफिक सूरज, अंकुश पडवळे यांचा सहभाग असणार आहे. सीताराम सावंत संवादक असणार आहेत.सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चित्रपट अभिनेते व कवी किशोर कदम यांची मुलाखत होणार आहेत. संवादक म्हणून युवराज मोहिते, महेंद्र महाजन उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 ते 2.30 वाजेपर्यंत संगीतकार प्रशांत मोरे यांचा आई एक महाकाव्य कार्यक्रम होणार आहे.इंद्रजित घुले संवादक असणार आहेत.
दुपारी 2 वाजता साहित्य संमेलनाचा समारोप व गौरव समारंभ संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी इंद्रजित भालेराव भुषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना.दिपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी किशोर कदम, आ.शहाजीबापू पाटील, आ.समाधान आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ.द.ता.भोसले, योगिराज वाघमारे, भास्कर चंदनशिवे, डॉ.कृष्णा इंगोले यांचा गौरव होणार आहे.
सदर संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोमेश यावलकर, डॉ.कृष्णा इंगोले, प्रबुध्दचंद्र झपके, डॉ.प्रभाकर माळी, सागर पाटील, डॉ.सयाजीराव मोकाशी, चेतनसिंह केदार, डॉ.संजीवनी केळकर, अ‍ॅड.गजानन भाकरे, प्रा.डॉ.बी.पी.रोंगे, प्रा.धनाजी चव्हाण, डॉ.यशपाल खेडकर, खंडू सातपुते, दिलीप इंगवले, संजय नवले, दिग्विजय पाटील, सुनील जवंजाळ, संभाजी आलदर, दादासाहेब लवटे, ज्योतीराम फडतरे आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!