पिरळे येथे महालक्ष्मी यात्रा उत्साहात संपन्न

नातेपुते (प्रतिनिधी) तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे सालाबाद प्रमाणे महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळेस तीन दिवस सलग यात्रा सुरू होती.
हनुमान जयंती च्या दिवसापासून यात्रेला सुरुवातात होते सलग दोन ते तीन दिवस यात्रा असते. हनुमान जयंती निमित्त गावातील हनुमान मंदिरामध्ये भजन महाप्रसादाचे आयोजनेले जाते.तसेच यावेळेस यात्रेनिमित्त धुमधडाका ऑर्केस्ट्रा व राजाराम देवकाते लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा तमाशा ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी गावांमध्ये महालक्ष्मी पालखी तीन मजली रथामध्ये विराजमान करून सर्व जातीधर्माच्या लोकांच्या सहाय्याने रथ ओढत नेऊन समोर मानाच्या काट्या पारंपारिक वाद्य हलगी पिपाणी व डीजे लावून पालखी व मानाच्या काट्या गाव प्रदक्षिणागाव प्रदक्षिणा करण्यात आली. यात्रेमुळे गावामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे .यात्रा यशस्वी होण्यासाठी गावातील युवक,यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले ग्रामपंचायतीच्यावतीने यात्रे करून साठी सर्व सुविधा करण्यात आल्या होत्या.