मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यात स्वागत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोलापूर विमानतळ येथे जिल्हावासियांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित होते.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी तसेच महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार – ढोक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेत आणि फळपिकाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर सोलापूर विमानतळावरून त्यांनी खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण केले. यावेळी सोलापूर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
00000