सांगोला तालुका

बैठक शांतता कमिटीची; चर्चा मात्र अवैध धंद्याची

सांगोला पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या शांतता कमिटीची बैठक अवैध धंद्याच्या चर्चेनी गाजली. सांगोला तालुक्यातील अवैध धंदे बंद करा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍यांच्या मुसक्या आवळा अशी मागणी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यापुढे करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बसवेश्वर जयंती व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलीस स्टेशनच्यावतीने शांतता कमिटीची बैठक काल शुक्रवार दि.12 एप्रिल रोजी बचतभवन हॉल,पंचायत समिती सांगोला येथे आयोजीत करण्यात आली होती. व्यासपीठावर खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्रीताई पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील, मुख्याधिकारी सुधीर गवळी, कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, कमरुद्दीन खतीब, हाजी शब्बीरभाई खतीब, सुरज बनसोडे, अतुल पवार, जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांगोला तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असून गोरगरीबांना नागरिकांचे घरे यामुळे उध्दवस्त होत आहेत.या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेतअवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे.त्यामुळे सांगोला तालुक्यातील अवैध धंदे बंद करा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍यांच्या मुसक्या आवळा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे व बाबासाहेब बनसोडे यांनी केले.
सांगोला तालुक्यातील प्रत्येक खेडेगावात अवैध धंदे जोरात सुरु असून तालुक्यातील नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने वैतागले असल्याचे चित्र काल शांतता कमिटीच्या बैठकीप्रसंगी दिसून आले. त्यामुळे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे , उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील अवैध धंद्यावर कशा प्रकारे आळा बसवतील याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

सांगोला तालुक्यातील अवैध धंद्याबबत लवकरच कारवाई करणार आहे. पोलीस विषयक काही अडचणी किंवा मदतीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पो.नि.अनंत कुलकर्णी यांच्याशी संंपर्क साधावा.
शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!