सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला पोलिसांनी केलेल्या कारवाई ५ लाख ९२ हजार रु.किमतीचा गुटखा व पिकअप वाहन असा १० लाख ९२ हजार रु.चा मुद्देमाल जप्त,

सांगोला (प्रतिनिधी) पोलीस सांगोला मिरज रोडवर रात्री पेट्रोलिंग करीत असताना  वाटंबरे ता. सांगोला येथील पुलाजवळ  संशयास्पद पिकअप आढळल्याने पोलिसांनी पिकअपची चौकशी केली असता चालक सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता पिकअपमधील सुमारे पाच लाख ९२ हजार ८०० रुपये किमतीचा गुटखा व ५ लाख रु.किमतीचे पिकअप वाहन असा दहा लाख ९२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची घटना बुधवार दि. 12 एप्रिल रोजी सांगोला शहरातील वाटंबरे येथे घडली आहे.

सहा.पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर ,पोना विजय थिटे, पोना कोष्टी, पोना  निंबाळकर  हे सर्वजण मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा च्या सुमारास  सांगोला हद्दित पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना वाटंबरे ता.सांगोला गावचे पुलाजवळ. एम.एच-09. एफएल-1135 हे  वाहन संशयास्पदरीत्या आढळून आल्याने पोलिसांनी वाहन चालकास वाहनामध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्यास सांगोला येथील पोलिस स्टेशन, येथे आणुन सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखुचा साठा आढळून आला.पोलिसांनी जप्त मुद्देमालातुन एक नमुना भाग विश्लेषणासाठी वेगळा करुन उर्वरित साठा जप्त करुन पुढील आदेशापर्यंत सांगोला पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात ठेवण्यात आलेले आहे व पोलिसांनी सोलापूर येथील अन्नभेसळ कार्यालयास कळविले उमेश सुभाष भुसे  अन्न भेसळ सहायक आयुक्त सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अवैधरित्या पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा घेऊन जात असताना पोलिसांनी  हिरा पानमसाला चार लाख 11 हजार 870 रुपये किमतीची 33 पोती , रॉयल ७१७ तंबाखू एक लाख 80 हजार 960 रुपये किमतीची  29 पोती पाच लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा दहा लाख 92 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

याबाबत पिकप चालक यास ताब्यात घेऊन त्याच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अ अधिसूचना क्र. असुमाअ अधिसूचना-524/7 दिनांक 15 जुलै 2022 नुसार जारी केलेल्या प्रतिबंधित पानमसाला, सुगधित तबाखू, मावा इत्यादी तत्सम अन्न पदार्थाचा विक्री हेतू वाहतुक, साठा करुन अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26  नुसार गुन्हा नोंद केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!