शहीद जवान संस्थेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

सांगोला(प्रतिनिधी):- शहीद जवान संस्थेच्या वतीने थोर समाज सुधारक, संपूर्ण समाजाचे प्रबोधन करून भारतीय शिक्षणाची मूहर्तमेढ रोवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नेहरू चौक, सांगोला येथे साजरी करण्यात आली.
सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत कमलापूर ग्रामपंचायत सदस्य उद्योगपती राजाभाऊ गोडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भिमराव बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अँड प्रविण बनसोडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती दिली.या कार्यक्रमास उमाकांत बनकर, विकास पिसे, धनंजय शिर्के, अजित जाधव, अक्षय राऊत, शंकर नवले, भारत वसेकर, देवा मासाळ यांच्यासह शहीद जवान संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.