अचानक लागलेल्या आगीत जवळा ता.सांगोला येथील साळुंखे कुटुंबियांचा दुर्दैवाने संसार उद्ध्वस्त; मा.आ.दिपकआबांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन दिला मदतीचा हात

जवळा ता. सांगोला येथील शेखवस्ती परिसरामध्ये रहिवासी असलेले श्री. संभाजी मसु साळुंखे व संजय संभाजी साळुंखे यांचे अचानक राहत्या घरी आग लागून राहते घर जळून खाक झाले.महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सरकारी मदतीची कोणती वाट न पाहता स्वतः मदतीचा हात दिला. यावेळी सदर घटनेचा तलाठी माळी भाऊसाहेब यांनी तात्काळ पंचनामा केला.
ही सदर घटना सकाळी 09:00 च्या सुमारास घडली. या गावांमध्ये राहणारे हे साळुंखे कुटुंबीय आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज रोजंदारीवर जातात. अतिशय गरीब असलेले कुटुंब हे आजही नेहमीप्रमाणे रोजंदारीने कामाला गेले होते, यावेळी अचानक घराला आग लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या दुर्दैवी घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही व या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. अतिशय गरीब असलेल्या या कुटुंबात असा दुर्दैवी प्रसंग घडून आल्यामुळे संपूर्ण जवळा गाव व परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर आगीमध्ये घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यामुळे आयुष्यभर कष्ट करून उभे केलेले सर्वच्या सर्व डोळ्यादेखत जळून खाक होताना अतिशय वेदनादायक प्रतिक्रिया साळुंखे कुटुंबियांच्या होत्या. नुकतेच त्यांना घरकुल मंजूर झाले होते पण घरकुल हे लांबणीवर पडत असल्यामुळे गावातीलच बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन त्यांनी काही रक्कम घरातच ठेवली होती ती रक्कम सुद्धा या आगीमध्ये जळून खाक झाली आहे.
सदर दुर्दैवी घटने विषयी माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सर्व संसारोपयोगी साहित्य, घरातील सर्व सदस्यांना कपडे, अन्नधान्य यांची तात्काळ मदत त्यांनी यावेळी केली.
गोरगरिबांचा कळवळा असलेला लोकनेता दिपकआबा
मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्वतःच्या घरासमोर चालू असलेले पत्रा शेडचे काम बंद करून ते पत्रा शेड त्या साळुंखे कुटुंबीयांच्या शेतामध्ये मारून त्या कुटुंबीयांना निवारा करून देण्याच्या तात्काळ सूचना कार्यकर्त्यांना यावेळी आबांनी दिल्या.