श्री.बाळासाहेब शिंदे सर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जवळे प्रशालेच्या वतीने सत्कार संपन्न.

जवळे(प्रशांत चव्हाण)सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर तसेच सूर्योदय फाउंडेशन सांगोला यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार कै.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळेचे प्राचार्य श्री.बाळासाहेब श्रीरंग शिंदे सर यांना मिळाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा फेटा,शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रशालेचे उपमुख्यद्यापक श्री.संजय पौळ सर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.ए जी गायकवाड सर,ज्येष्ठ शिक्षक श्री.संतोष शेटे सर,श्री.सावंत सर,श्री बि.डी शिंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री शिंदे सरांच्या कामाचे कौतुक करून श्री.शिंदे सरांना पुरस्कार मिळाल्याचा मनापासून आनंद आणि अभिमान असल्याच्या भावना व्यक्त करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मा.शिंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असताना हा पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे असे मत व्यक्त केले.

पुढे बोलताना शिंदे सर म्हणाले मी पुरस्कार मिळवण्यासाठी कधीच काम केले नाही प्रामाणिकपणे, विश्वासाने व चिकाटीने काम करीत राहिलो आणि त्याच कामाची दखल घेऊन पुरस्कार मिळाला या पुरस्काराचे श्रेय त्यांनी सर्व विद्यार्थी व सहकारी शिक्षकांना दिले कारण विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केलेल्या कामामुळे गुणवत्ता व क्रीडा क्षेत्रामध्ये प्रशालेचा आलेख नेहमी उंचावता आला प्रशालेतील उप मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभारी असल्याचे मत व्यक्त केले. शेवटी या कार्यक्रमाचे आभार श्री. लांडगे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button