महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सांगोल्यात उत्साहात साजरी; अभिवादन करण्यासाठी सांगोल्यात उसळला जनसागर

सांगोला (प्रतिनिधी):- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचा उत्साह संपूर्ण सांगोला तालुक्यात दिसून आला. रात्री 12 वाजलेपासून फटाक्यांच्या आतषबाजीने जयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली.14 एप्रिल रोजी दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सांगोला शहरात भीमसागर उसळला होता.
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती सांगोला शहर व परिसरात विविध प्रबोधनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्युतरोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांच्या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सांगोला शहरात सर्वत्र निळेध्वज, शुभेच्छा फलक यामुळे शहर निळे भीममय झाले होते.
यावेळी आ.शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख, अॅड.पृथ्वीराज चव्हाण, राणीताई माने, रफिक नदाफ, प्रशांत धनवजीर,गटनेते आनंदा माने, चेतनसिंह केदार-सावंतछायाताई मेटकरी, तानाजीकाका पाटील, सतीश सावंत, सुरज बनसोडे, अप्सराताई ठोकळे, स्वातीताई मगर, अतुल पवार, तहसीलदार सुधाकर मागाडे, आकाश व्हटे, ओंकार उकळे, इंजि.रमेश जाधव, बापूसाहेब ठोकळे, किशोर बनसोडे, रामस्वरूप बनसोडे, रुपेश बनसोडे, कुंदन बनसोडे, विजय बनसोडे, बाबा बनसोडे, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, नायब तहसीलदार किशोर बडवे, सचिन सावंत , अक्षय बनसोडे, बाळासाहेब मस्के, निलकंठ लिंगे सर, आदी मान्यवरांसह सांगोला तालुक्यातील सर्व समाज बांधव व त्यातील पदाधिकारी तसेच भीमा अनुयायी पंचायत समिती आजी-माजी सदस्य. जिल्हा परिषद आजी माजी सदस्य. नगरपालिका आजी-माजी नगरसेवक. सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते, तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच सर्व समाज बांधवांचे प्रमुख प्रतिनिधी मोठ्या संख्येने महामानवास मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते.
सकाळच्या सुमारास सांगोला शहरांमध्ये सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समता रॅली करण्यात आली.समता रॅली नंतर तमाम आंबेडकरी भीमसैनिकांना बौद्ध विहार येथे जेवणाचे व पिण्याची पाण्याची नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समता रॅली व मिरवणूक यशस्वीरित्या शांततेमध्ये संपन्न करण्यास मोलाचे योगदान ठरले.