सांगोला तालुका

गाढवाच्या शिंगरूवर उपचार करून पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांनी जपला सेवाधर्म

सांगोला (प्रतिनिधी)- दहा ते बारा दिवस वयाच्या गाढवाच्या शिंगरूवर जागेवर जाऊन उपचार करून पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांनी आपला सेवाधर्म जपण्याचे कार्य केल्यामुळे पक्षीप्रेमी ग्रुपच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

पुजारवाडी, सांगोला येथे सक्सेस क्लासेसचे चालक श्री. महामुनी सर यांच्या घराशेजारी गाढवाचे एक शिंगरू जखमी अवस्थेत त्यांना दिसून आले. महामुनी सरांनी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून या जखमी शिंगरूवर उपचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यादव यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांना दुरध्वनीवरून संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर तात्काळ डॉ. सुर्वे यांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत पुजारवाडी येथे जाऊन काट्याकुट्यात पडलेल्या या शिंगरूला बाहेर काढून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. दहा-बारा दिवस वय असलेल्या या शिंगरूजवळ त्याची आईही उभी होती. मात्र ओरडण्याशिवाय ती काहीही करू शकत नव्हती. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मानेवर मारल्यामुळे जखमा झालेल्या या शिंगरूवर डॉ. सुर्वे यांनी उपचार करून आपला सेवाधर्म जपला आहे. यापूर्वीही स्टॅन्ड परिसरात गाढव तसेच शिवाजीनगर परिसरात गायीवर वेळीच जागेवर उपचार करून जीवदान दिलेले आहे. पक्षी प्रेमी ग्रुपच्या वतीने त्यांच्या या कार्याबद्दल अभिनंदन करून त्यांचे आभारही व्यक्त केले गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!