राजकीयमहाराष्ट्र
पंढरपूरच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रश्न मार्गी लागणार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली राज साहेब ठाकरे यांची भेट.

पंढरपूर:- गोरगरिबांच्या समस्या घेऊन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मुंबई येथील शिवतीर्थ त निवासस्थानी भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आणि ताबडतोब प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावेत अशी विनंती केली. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी त्वरित मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात ताबडतोब निर्णय घेण्याचे सूचना केली. आणि तशा पद्धतीचे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हा गोरगरिबांचा प्रश्न मार्गी लागून सर्वसामान्यांना न्याय मिळेल आणि गरीब लोक त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये राहायला जातील .आणि येणारी दिवाळी हे नवीन घरामध्ये साजरी करतील अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
पंढरपूर शहरात प्रधान मंत्री आवास योजनेचे काम केले तीन वर्षापासून चालू आहे, अनेक गोरगरीब लोकांनी यामध्ये स्वतःला घर मिळेल ,घराच स्वप्न पूर्ण होईल म्हणून बँकांकडून कर्ज काढून, सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन ,घरातील सोनं नाणं मोडून पंढरपूर नगरपालिकेने आव्हान केल्याप्रमाणे त्या ठिकाणी संपूर्ण रक्कम नगरपालिकेच्या खात्यामध्ये भरले आहे. नगरपालिकेने तीन वेळा लेखी पत्र दिले की आम्ही दोन महिन्यात पूर्ण करू, तीन महिन्यात पूर्ण करू परंतु आत्तापर्यंत त्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. ही सरळ सरळ जनतेची फसवणूक आहे .वास्तविक पाहता गेले तीन वर्षापासून कर्ज काढलेल्या लोकांना दर महिन्याला व्याज चालू आहे. ते व्याज भरत आहेत, घर भाडं भरत आहेत परंतु नगरपालिकेला यांचे कसलेही सोयर सुतक नाही म्हणून आज या सर्व बाबीवर चर्चा करण्यात आली.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे नेते अमित ठाकरे ,मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, नेते अनिल शिदोरे,नेते शिरीष सावंत, नेते जयप्रकाश बाविस्कर ,नेते अभिजित पानसे,नेते संजय चित्रे,नेते संदीप देशपांडे, नेते अविनाश जाधव ,नेते बाबू वागस्कर इत्यादी उपस्थित होते,.