महाराष्ट्र

नातेपुते येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

नातेपुते (सुनिल ढोबळे):-घटनेचे शिल्पकार डा बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती नातेपुते येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.सकाळी 10.30 वाजता सपोनी संपांगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले .बौध्दाचार्य समीर सोरटे व प्रकाश साळवे यांच्या हस्ते बुध्दवंदना घेण्यात आली.
मा आमदार रामभाऊ सातपुते म्हणाले की समाजाच्या शेवटच्या लोंकान पर्यंत न्याय मिळावा म्हणून डा बाबासाहेब आंबेडकर यांनी विशेष प्रयत्न केले.वंचित घटकामध्ये जन्माला येऊन सुध्दा त्यांनी सविधांन लिहिले जगाला हेवा वाटावा असे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष एन के साळवे म्हणाले की, नातेपुते गावाला जयंतीची चांगली परंपरा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात घेऊन काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी सपोनी सपांगे साहेब,बशिर काझी,रोहीत सोरटे,विशाल सोरटे,कृषी अधिकारी सुभाष साळवे, विश्वरत्न साळवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटना नातेपुते शहराच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे व उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी दि 1 एप्रिल ते 14 एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले व जयंती महोत्सव समितीला धन्यवाद दिले.जयंती महोत्सव समिती तर्फे डा सिध्दार्थ सोरटे, प्रज्ञा सोरटे, मंगल सोरटे, काशिनाथ कुडाळकर, वैभव सोरटे या सर्वाचा सन्मान जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आला. सर्व भिमसैनिक यांच्या वतीने गावामधुन रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमास बी वाय राऊत, श्रावण सोरटे, अविनाश दोशी, अण्णा पांढरे, किशोर पलंगे, युवराज वाघमारे, बाळासाहेब सोरटे, नवाज सोरटे, दादा लाळगे, रोहीत शेटे, विनोद रणदिवे, संघर्ष सोरटे, बंटीराजे सोरटे, सौरभ सोरटे, आदी उपस्थित होते .प्रास्ताविक बुध्दभुषण साळवे यांनी, सुत्रसंचालन राकेश सोरटे व आभार समीर सोरटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!