सांगोला महाविद्यालयात “अर्थशास्त्र व वाणिज्य मधील भवितव्याच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न

सांगोला प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामध्ये दिनाक 15 एप्रिल रोजी “अर्थशास्त्र व वाणिज्य मधील भवितव्याच्या संधी” या विषयावर प्रा. डॉ . तानाजी घागरे यांचे व्याख्यान संपन्न झाले. शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट मधील डॉ. तानाजी घागरे यांनी अर्थशास्त्र व वाणिज्य पदवी शिक्षणानंतर शिवाजी विद्यापीठामध्ये एम.आर.एस., एम.एस.डब्ल्यु, एम.सी.ए., एम.बी.ए., एम.टेक इ. अशा विविध पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी उपलब्ध असून त्यातून कालानुरूप व्यावसायिक शिक्षणा मधून उज्वल भवितव्याच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या या संधीचा उपयोग करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन बाबर यांनी तर आभार प्रा. प्रशांत गोडसे आणि सूत्रसंचालन प्रा.सोनल भुंजे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील विभाग प्रमुख तसेच डॉ. वेदपाठक व प्रा.
वाघमारे यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयांमधील बीए व बीकॉम चे विद्यार्थी उपस्थित होते.
