सांगोला महाविद्यालयात ‘’वस्तू व सेवा कर आणि वाणिज्य क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर सी.ए.राजेंद्र डांगी यांचे व्याख्यान संपन्न.
.सांगोला महाविद्यालय सांगोला येथे मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी वाणिज्य विभागाच्या वतीने मा.श्री राजेंद्र डांगी चार्टर्ड अकाउंटंट पुणे, यांचे वस्तू व सेवा कर आणि वाणिज्य क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी वाणिज्य क्षेत्रात यश संपादन करावयाचे असेल तर पदवी बरोबर व्यवस्थापन कौशल्य, ज्ञान, आत्मविश्वास व प्रात्यक्षिक कौशल्यांची आवश्यकता आहे. तसेच अकाउंटन्सी व टॅक्सेशन या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून सी.ए. , एम.बी.ए. , बँकिंग इन्शुरन्स,एच.आर. मार्केटिंग आणि स्पर्धा परीक्षा इत्यादी मध्ये सुद्धा करिअरच्या संधी उपलब्ध आहेत प्रतिपादन केले. तसेच यावेळी मार्गदर्शन करीत असताना आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्या क्षेत्रातील उपलब्ध संधी, सुरक्षितता आणि वाढ या गोष्टींचाही विचार करावा असे विचार त्यांनी मांडले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.अर्जुन मासाळ यांनी हे महाविद्यालय व वाणिज्य विभाग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कायम कटिबद्ध असतो त्याचाच भाग म्हणून आजचे हे व्याख्यान आयोजित केले असून विद्यार्थ्यांनी त्यांचा पुरेपूर फायदा घ्यावा व योग्य मार्ग निवडून वाटचाल करावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.डॉ.सौ.विद्या जाधव यांनी केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.सुरेश भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विभागातील प्रा. समाधान माने,कार्यालयीन अधीक्षक श्री.पी.एस.शिंदे, श्री महादेव काशीद यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन सुरवसे यांनी केले तर आभार प्रा.निकिता लामगुंडे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.