शैक्षणिकसांगोला तालुका

मा.भाऊसाहेब रुपनर  यांना राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार जाहीर.

सांगोला: स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवाच्या निमित्ताने फॅबटेक ग्रुप ऑफ इंडस्ट्री चे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर याना सन २०२३ चा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित ‘’ मान कर्तृत्वाचा ..सन्मान नेतृत्वाचा “ राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२३ चा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रुपनर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक  २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह ,सावेडी रोड येथे होणार असून उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांच्या औद्यगिक, सामाजिक, शैक्षणिक  व राजकीय  क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सदर पुरस्काराबद्दल फॅबटेक एज्युकेशन सोसायटी मधील  कॅम्पस डायरेक्टर, सर्व विद्याशाखांचे प्राचार्य ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!