सांगोला तालुका

दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावतीने जवळा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

जवळा तालुका सांगोला येथे सालाबाद प्रमाणे मुस्लिम समाजातील पवित्र अशा रमजान ईदच्या 27व्या रोजा निमित्त महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष,मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
गेली 30 ते 32 वर्षापासून दरवर्षी मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वतीने जवळा गावातील सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते.
समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना आपले वाटणारे नेतृत्व म्हणजे दिपकआबा साळुंखे पाटील अशी प्रतिमा संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये आहे. संपूर्ण सांगोला तालुक्यातील मुस्लिम समाजावर मा. आ. दिपकआबांचे कायम विशेष लक्ष राहिले आहे. जवळा ता.सांगोला येथील प्रत्येक मुस्लिम कुटुंबांना या इफ्तार पार्टीचे आमंत्रण देऊन साळुंखे पाटील कुटुंबीयांकडून सर्वांना शुभेच्छा देण्यात येत असतात, या वर्षीच्या इफ्तार पार्टीसाठी अस्थिरोग तज्ञ डॉ.पियुषदादा साळुंखे पाटील यांनी हजर राहून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या. या इफ्तार पार्टीसाठी बाबासाहेब इमडे, बाळासाहेब गावडे, अशोक भोसले, नागेश घुले,अजित देशमुख, विजय सरगर – पाटील, प्रमोद साळुंखे पाटील, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजातील लोक यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!