सांगोला तालुका

नगरपालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर आनंदा माने यांचे उपोषण मागे

 

सांगोला शहरातील वंदे मातरम चौक ते चिंचोली रोड आरक्षण क्र. 47 बगीचा पर्यंत विविध हातगाडे व शेडनेट मारून नागरिकांनी अनाधिकृतरित्या केलेले अतिक्रमण काढणेसाठी माजी नगरसेवक आनंदा माने हे दि. 1 मे महाराष्ट्र दिनी सांगोला नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणास बसले होते. सदरचे अतिक्रमणामुळे तेथील वाहतूकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रकारसुध्दा घडले आहेत. तसेच त्याठिकाणी असलेल्या बगिचाला अतिक्रमणाने विळखा घातला असून बगीचामध्ये येणार्‍या लहान बालक व वयोवृध्दांना सुध्दा या वाहतूकीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदरचे अतिक्रमण काढणेकामी आनंदा माने यांनी सांगोला नगरपरिषदेकडे याबाबत पत्रव्यवहारही केला होता. परंतू नगरपालिका प्रशासन याबद्दल वेळकाढूपणा करत असल्यामुळे आनंदा माने यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. दरम्यान उपोषणस्थळी आनंदा माने यांना विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी व पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, वकील व इतर नागरिकांनी उपस्थिती दर्शवून मोठ्या प्रमाणात पाठींबा दिला होता.
सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी उपोषणस्थळी भेट देवून सदरच्या अतिक्रमणाबाबत लवकरच कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले व सदरचे उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर आनंदा माने यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. तसेच उपस्थित नागरिकांनी शहरातील पार्किंगच्या प्रश्नाबाबत सांगितले असता पार्किंगचा विषय सुध्दा लवकरच मार्गी लावू, असे मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

शहरातील वंदे मातरम चौक येथील बगीचाजवळील अतिक्रमण काढणेसाठी नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार करूनसुध्दा प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे मला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. परंतू आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विनंतीला मान देवून व सदरचे अतिक्रमण लवकरच काढून घेवू, असे मुख्याधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आहे.
– आनंदा माने, माजी नगरसेवक सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!