शैक्षणिक

करिअर घडवत असताना अभ्यासामध्ये सातत्य व कठोर परिश्रम असले पाहिजे-राजश्रीताई पाटील

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये तारुण्याकडे पाहताना कार्यक्रम संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):-  किशोरवयीन मुलींनी कोणकोणत्या मर्यादा पाळाव्यात, तारुण्य म्हणजे केवळ आकर्षण नव्हे तर अथक परिश्रम करून आपले करिअर घडविण्याची महत्त्वाची वेळ असते. या वाक्याच्या माध्यमातून त्यांनी मुलींच्या समोर तारुण्यातील सकारात्मक दृष्टिकोन परखडपणे समोर ठेवला. एमपीएससी व यूपीएससी याचा अभ्यासक्रम याबद्दल सविस्तर माहिती दिली व या परीक्षांची तयारी करण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा, मुलींनी आपल्या आई-वडिलांचा आदर्श घेतला पाहिजे व आपल्या स्वतःचे करियर घडविले पाहिजे, करिअर घडवत असताना नेहमी अभ्यासामध्ये सातत्य व कठोर परिश्रम असले पाहिजे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्रीताई पाटील मॅडम यांनी व्यक्त केले.
न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने मध्ये तारुण्याकडे पाहताना… हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सौ.राजश्री पाटील मॅडम व स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ. निकिताताई देशमुख उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती राजश्रीताई पाटील मॅडम बोलत होत्या.
प्रारंभी स्वर्गीय डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर अतिथी देवो भव या संकल्पनेनुसार उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत व सत्कार संस्था सचिव श्री. विठ्ठलराव शिंदे सर यांनी केला.
यावेळी डॉ.निकिताताई देशमुख म्हणाले की, मुलींच्या किशोरवयीन वयामध्ये होणार्‍या बदलासंबंधी माहिती दिली. या माहितीच्या माध्यमातून त्यांनी मुलींच्या मनामध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक पातळीवर निर्माण होणार्‍या प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. आहाराबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले. आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढून पुढे जाता आले पाहिजे. आहारामध्ये विटामिन चा वापर कसा केला पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केले. शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता कशी वाढवावी याबद्दल सांगितले. आई- वडील,शिक्षक हे योग्य मार्गदर्शक आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु…. या श्लोकाप्रमाणे सर्व गुरुजनांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी मुलींचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांचे निरसन केले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सौ.शकुंतला केदार, माजी उपनगराध्यक्ष सौ.स्वातीताई मगर,माजी पंचायत समिती सदस्य सौ.अपर्णाताई शिंदे, विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.डॉ.सौ सीमा शिंदे मॅडम, संस्था सदस्य प्रा.डॉ.अशोक शिंदे, प्रा.दीपक खटकाळे, प्रा.जयंत जानकर, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य लक्ष्मण गावडे, उपप्राचार्य हेमंत अदलिंगे, पर्यवेक्षक नामदेव कोळेकर, कार्यक्रम आयोजन समितीचे प्रमुख प्रा.जालिंदर टकले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष राजगुरू, ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी एन. एस.एस. स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा.सौ.जयश्री पाटील मॅडम यांनी केले. अध्यक्षीय सूचना गणित विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.सौ.सुप्रिया माने मॅडम यांनी मांडली, अनुमोदन इंग्रजी विभागाच्या प्रा. सौ.ढाळे यांनी मानले. प्रास्ताविक मराठी विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.सौ.येडगे मॅडम यांनी केले, तर आभार ग्रंथालय प्रमुख सौ.सलगर मॅडम यांनी मानले.
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मधील 19 वर्षे वयोगटाखालील व 17 वर्षे वयोगटाखालील मुलींनी जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल सुजाता श्रीकांत बाबर व सानिका श्रीकांत बाबर या दोघी भगिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!