रोटरी क्लब सांगोला यांचे प्रतिमहाबळेश्वर ( पाचेगाव बुद्रुक ) व बानुरगड या ऐतिहासिक स्थळाला भेट..

रोटरी क्लब सांगोला यांनी आज दिनांक 22 जून रोजी वर्षा सहलीचे आयोजन केले होते. त्यामध्ये प्रति महाबळेश्वर म्हणून सांगोला तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या पाचेगाव बुद्रुक या ठिकाणी भेट दिली व रायला या कार्यक्रमाचे आयोजन केले.
न्यू इंग्लिश स्कूल पाचेगाव या ठिकाणी रायलाचे आयोजन करून सर्व विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये रो. हळळीसागर रो. डॉक्टर सोनलकर रोटरी अध्यक्ष साजिकराव पाटील रो. श्रीपती आदलिंगे रो. विजय मेत्रे रो. मिलिंद बनकर रो. विकास देशपांडे रो विलास बिले रो अशोक गोडसे रो वैजनाथ घोंगडे रो ज्ञानेश्वर कमले रो. धनाजी शिर्के रो निसार इनामदार इत्यादी रोटरियन सहभागी झाले होते.
ऐतिहासिक वारसा असलेल्या बानुरगड या ठिकाणी बहिर्जी नाईक यांच्या समाधीला नतमस्तक होऊन रोटरी सदस्यांनी वेगळे समाधान व्यक्त केले. या सर्व सहलीचे नियोजन सन 24- 25 चे सेक्रेटरी विलास बिले यांनी केले होते.
सुकाचारी या ठिकाणी सुग्रास जेवणाचे आयोजन त्यांच्याकडून सर्वांसाठी करण्यात आले. अशाप्रकारे ऐतिहासिक व निसर्गरम्य परिसराची एक भेट व रोटरीच्या माध्यमातून चालणारा विद्यार्थी विकास अशी दुहेरी फायद्याची आजची सहल झाली अशी भावना रोटरी सदस्यांनी व्यक्त केली. तसेच आजचा दिवस सार्थकी लागल्याची भावना व्यक्त केली