फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये “आंतरराष्ट्रीय योगदिन” उत्साहात साजरा

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज सांगोला येथे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जीवनामध्ये शैक्षणिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन”आयुष्य करायचे असेल निरोगी आणि आनंदी, योगाचा ध्यास घ्या मनोमनी: या उक्तीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये वेगवेगळे प्राणायाम व योगाचे प्रकार, सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता आठवीतील अन्वी कांबळे, इयत्ता तिसरीतील अनया बुरुंगले या विद्यार्थिनींनी योगदिनाबद्दल माहिती सांगितली.
आदित्यस्य नमस्कारान्ये कुर्वन्ति दिने दिने।
आयुः प्रज्ञा बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते ।।
जे दररोज सूर्यनमस्कार करतात त्यांचे वय, बुद्धी, बल, वीर्य आणि तेज वाढते.आपल्या जीवनामध्ये व्यायामाचे महत्त्व आहे. हे प्रशालेतील शिक्षक श्री.अभिनंदन टाकळे यांनी सांगितले. त्यानंतर इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्याद्वारे वेगवेगळ्या योगाचे प्रकार विद्यार्थ्यांसमोर सादर केले. जागतिक योगदिन आणि जागतिक संगीत दिवस या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून शाळेतील संगीतशिक्षक डॉ.अमोल रणदिवे यांनी संगीता बद्दलचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
महाराष्ट्राची ख्याती सांगणारे एक गीत विद्यार्थ्यांसमोर सादर केले. यानंतर प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री.पंचाक्षरी स्वामी यांनी सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बैठे योगा प्रकार, खडे योगा प्रकार, त्याचबरोबर वेगवेगळी आसने, सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक दाखवून ते विद्यार्थ्यांकडून करून घेतले. योग दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर प्रशालेतील शिक्षिका सौ.शितल बिडवे यांनीही विद्यार्थ्यांसोबत आसन प्रकार केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु.रेश्मा तोडकर यांनी केले.
हा कार्यक्रम फॅबटेक संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, ए.ओ. वर्षा कोळेकर,सुपरवायझर वनिता बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.