सांगोला महाविद्यालयाच्या एन.सी.सी. छत्रांचा ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प मध्ये सहभाग
सांगोला महाविद्यालयातील दोन एन.सी.सी. महिला छात्र सार्जंट प्रणाली सोळगे व सार्जंट ऋतुजा गरंडे यांनी ऑल इंडिया एन.सी.सी. ट्रेकिंग कॅम्प मध्ये यशस्वी सहभाग घेतला. देशभरातून या ट्रेक कॅम्पमध्ये ५२५ महिला एन.सी.सी. छात्र सहभागी झाले होते. तमिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतातील उटी या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. एन.सी.सी.
छात्रांमध्ये साहस, आव्हानात्मक जबाबदारी, डोंगरदर्यातून साहसी प्रवास व आपल्यातील उत्साह कायम ठेवून दिलेले टार्गेट पूर्ण करणे इत्यादीसाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कोईमतूर ग्रुप हेडक्वार्टरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शिवा राव व ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अवनिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली या ट्रेक कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. ट्रेकिंगचा बेस कॅम्प सी.एस.आय. इंजीनियरिंग कॉलेज केत्ती येथे होता. तर पुढील कॅम्प सी.एस.आय. हायस्कूल उटी व नानजानंडू येथे ट्रेक कॅम्प झाले. ३८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजेश गजराज व कर्नल विक्रम जाधव, सुभेदार मेजर ठाकूर, सुभेदार प्रेमानंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बाबुराव गायकवाड, प्रा. पी.सी.झपके सर, मा. श्री. ता.ना. केदार, मा. श्री म.सि. झिरपे सर व प्रभारी प्राचार्य सुरेश भोसले, कंपनी कमांडर कॅप्टन संतोष कांबळे यांनी छात्रांचे अभिनंदन
केले.