तिप्पेहळी येथे आ रवींद्र धंगेकर यांची सपत्नीक फलटणे परिवाराच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

सांगोला तालुक्यातील तिप्पेहळी येथे रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, इंजिनीयर, अशोक ( आबा) नरळे- फलटणे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रवींद्र भाऊ धंगेकर व सौ प्रतिभाताई धंगेकर व शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्नेहभोजनासाठी उपस्थिती लावली. यावेळी त्यांचा सत्कार रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ फेटा देऊन माजी सरपंच बाबासो नरळे- फलटणे, पांडुरंग नरळे, विलास नरळे व इंजि अशोक नरळे- फलटणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व नेते मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले इंजिनीयर अशोक नरळे व माझे पारिवारीक जिव्हाळ्याचे सबंध असल्यामुळे मी आणि माझी पत्नी प्रतिभाताई धंगेकर आवर्जून स्नेहभजनासाठी आलो. फलटणे परिवाराचा सत्कार स्वीकारून आनंद झाला असे आमदार धंगेकर म्हणाले. यापुढे इंजिनिअर अशोक ( आबा) नरळे फलटणे परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास माझी सरपंच बाबासाहेब फलटणे, सरपंच अरुण बापू बजबळकर, बाळासाहेब गोडसे सर, पत्रकार जगदिश कुलकर्णी, पोलीस पाटील राजू करांडे, डेअरी मॅनेजर पांडुरंग नरळे, विलास नरळे, परमेश्वर खांडेकर, नगरसेवक नवनाथ भाऊ रानगट, दत्ता नरळे, अलका करांडे मॅडम, वृषभ करांडे, इंजीनियर भूषण गोडसे, श्रीमंत अण्णा बजबळकर, ईश्वर बजबळकर, यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला येथे माननीय शरद पवार, मा नाना पटोले आणि इतर मान्यवर यांचे हस्ते सत्कार स्वीकारून तिप्पेहळी करांचा मान ठेऊन सर्वांनी फलटणे फार्महाउस वरती स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार
~ इंजिनीयर उद्योगपती अशोक आबा नरळे~फलटणे
कोळा महावितरणचे कौतुक….
तिप्पेहळी येथे आ रवींद्र धंगेकर डॉ बाबासाहेब देशमुख स्नेह भोजनासाठी आले असता तांत्रिक बिघाडामुळे रात्री १२ वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला अगदी कमी वेळात कोळा महावितरणचे अभियंता कोळा महावितरण चे सहाय्यक अभियंता राजेंद्र बोराडे यांनी कर्मचाऱ्यांना पाठवून तातडीने विद्युत पुरवठा अगदी अल्प वेळात सुरू केला यामुळे आ रवींद्र धंगेकर डॉ बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले. कोळा महावितरण चे कार्य कार्यतत्परता यावरून दिसून आली.