राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू यश कदम याची सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड

राजमाता क्रिकेट ॲकॅडमीचा सांगोला येथील खेळाडू कु. यश बापू कदम याची 16 वर्षांखालील सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात मध्ये निवड झाली असून तो सध्या
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत आयोजित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी तो रवाना झाला आहे.
त्याच्या या निवडीबद्दल त्याला पुढील वाटचालीसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक आनंदा माने, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन निवड समितीचे सदस्य उदय डोके सर व डॉ. अमर शेंडे सर यांनी शुभेछा दिल्या. तसेच त्याला राजमाता क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर, रणजित गवळी सर, अक्षय जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.