खवासपुर,इटकीत पाण्याची तिव्र टंचाई असुनही टॅकर सूरू करण्यास प्रशासनाची टाळाटाळ लवकरात लवकर टॅकर सुरू न केल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

गेल्या दिड-दोन महिन्यांपासून सांगोला तालुक्यातील खवासपुर,इटकी,लोटेवाडी, सोनलवाडी इ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे व खवासपुर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या धोरणामुळे व थकबाकी मुळे वाड्या वस्त्या वर पाइपलाइन असुन दोन महिन्यांत एकदाही नळाला पाणी आलेलं नाही गावठाणात सात आठ दिवसांत एकदा पाणी येत आहे पिण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या टंचाई मुळे नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे नदी काठावरील गावात अशी अवस्था आहे तर ईटकी सोनलवाडी या गावात विचार न केलेला बरा लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत तर पाणी पुरवठा विभागाचे प्रशासकिय अधिकारी गटविकास अधिकारी चाळीस किलोमीटर अंतरावरील लोकांनी येऊन पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना व टॅकर सुरू करण्याची मागणी करतायत तर नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ केली जात आहे. या भागातील डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या पासून शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत यामुळे जनावरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे त्यांच्या चाय्राचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे दिड महिना झाले टॅकर प्रस्ताव सादर केला परंतु टाळाटाळ केली जात आहे चार दिवसांत प्रश्न न सोडल्यास ग्रामस्थांसह तहसिल कार्यालय व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार -श्री.धुळा करचे मा.सरपंच इटकी
पावसाळ्यात पाणी पुजन करणारे नेते जाणिवपूर्वक पाणी टंचाई कडे दुर्लक्ष करत आहेत तर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी निकृष्ट कामांत भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत हे अधिकारी जबाबदारी पासून पळ काढत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे –नितीन जरे सदस्य ग्रा.पं.खवासपुर