सांगोलकर कुटुंबाने कष्टशिवाय यश प्राप्ती नाही हे दाखवून दिले – आमदार शहाजीबापू पाटील
नाझरे प्रतिनिधी):-हमाली पासून शेती करून श्रावण सांगोलकर यांनी जिद्द व कष्टाने कुटुंबातील पाच मुली व एक मुलगा शासकीय सेवेत देऊन आदर्श निर्माण केला. महाराष्ट्रात असे इतर कोठेही नाही त्यामुळे सांगोलकर कुटुंबाचा आदर्श बलवडी गावाने घ्यावा. या कुटुंबाने कष्टशिवाय यश प्राप्ती नाही हे दाखवून दिले असे मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी बलवडी तालुका सांगोला येथे व्यक्त केले.
बलवडी ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने सांगोलकर कुटुंबाची यशोगाथा सर्वांना माहिती व्हावी म्हणून सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. सुरुवातीस माजी सरपंच बाळासो शिंदे यांनी कुटुंबाची यशोगाथा सांगितली
यावेळी डॉ.पियुषदादा साळुंखे-पाटील म्हणाले, आई-वडिलांचे कष्टामुळे संपूर्ण कुटुंब शासकीय सेवेत आले असून जावई पण शासकीय सेवेत आहेत यांचा आम्हास अभिमान आहे व गावास दिव्यत्व मिळवून दिले असे सांगत सांगोलकर कुटुंबियांचे कौतुक केले.
हा क्षण आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा असून आई-वडील व गुरुजनांची साथ समाजाकडे लक्ष न देता वाटचाल केली त्यामुळे यश प्राप्ती झाली व यासाठी आई-वडील हेच आमचे प्रेरणास्थान आहे असे सत्कारमूर्ती मनोगत व्यक्त केले. यावेळी नंदकुमार सांगोलकर व उमा, कांता, उज्वला,रेश्मा सांगोलकर यांचा आई-वडिलांसहित ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी सरपंच प्रसाद शिंदे, डॉ.शिवाजीराव ढोबळे, अॅड.सत्यजित लिगाडे, शिवसेना नेते साहेबराव शिंदे, सरपंच माऊली राऊत, उपसरपंच समाधान शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रविराज शिंदे, शिवाजी शिंदे, बाबासो पालसांडे, विलास धायगुडे, शिक्षक नेते रमेश शिंदे, माजी उपसरपंच विकास मोहिते, गणेश कमले, महादेव शिंदे, विलास बापू शिंदे, संदीप खुळपे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यतपस्वी आमदार काकासो साळुंखे पाटील यांनी बुद्धेहाळ तलावाचे पाणी बलवडी शिवारात आणण्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या निधनानंतर कामकाज थंड पडले पण त्यानंतर विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी वैयक्तिक लक्ष देऊन अधिकार्यांना सूचना देऊन संपूर्ण बलवडी शिवारात पाणी फिरवण्यासाठी काम वेगाने सुरू केले त्यामुळे पाणीदार आमदारांचा सर्वत्र जल्लोष गावकरी करत असल्याचे चित्र दिसत होते. यावेळी बलवडी-येपावाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.