विद्यामंदिरच्या 1987 च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):-कितीही दूर गेले, मोठ्या पदावर गेले, तरीही मुलींना माहेरची तर मुलांना आपल्या जन्म गावाची ओढ असतेच त्यातल्या त्यात आपल्या विद्यालयातील बालपणाचे मित्र त्यांची भेट घेण्याची ओढ ही वेगळीच असते अशीच घटना विद्यामंदिर हायस्कूल मधील 36 वर्षानंतर म्हणजे 1987च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत शालेय आठवणींना उजाळा देत स्नेह मेळावा आयोजित करून संपन्न केला.
या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.पी.सी झपके होते. त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, बरेच दिवस झाले भेट झाली नाही प्रत्येकाला भेटावे असे वाटते त्या काळातील टोपण नावे असतात त्या नावाने आज हाक मारली जात असतं त्याची अनुभूती येथे मिळते
मुंबईचे सहाय्यक कर आयुक्त विद्यार्थी धनंजय सुरवसे म्हणाले की त्या काळातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक उद्योजक शिक्षक कर्मचारी शेतकरी अधिकारी आधी सर्वच क्षेत्रात भरारी मारल्याचे श्रेय विद्यामंदिर प्रशालेला आहे याचा मला वेगळाच आनंद वाटला त्या दृष्टीने हा स्नेह मेळावा दरवर्षी साजरा करून आठवणींना उजाळा देता येईल
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे हे उपस्थित होते. शंकर सावंत, म.शं. घोंगडे, म.ज.घोंगडे, अंकलगी, नाकील सर, सुधीर उकळे, लिगाडे सर, सय्यद मॅडम, अंकलगी मॅडम, घाटोळे सर, देशपांडे मॅडम, गोटे मॅडम, सुरवसे आदी उपस्थित होते
प्रास्ताविक बंडू खडतरे यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल देशपांडे यांनी केले. यावेळी डॉक्टर मंजुश्री भोसेकर, मारुती इंगोले, मनीषा इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकात लिगाडे सर, सुधीर उकळे सर, अंकलगी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश गवळी, इसाक तांबोळी, मनोज ठोंबरे, दीपक वेदपाठक, राजू पवार, राजू जानकर, अनिल पाटील, बाबासाहेब दिघे ,भोसले सर यांनी विशेष परिश्रम घेतले.