सांगोला तालुक्यातील कोळा परिसरात गणपतीबाप्पांच्या पाठोपाठ तिसऱ्या दिवशी अनुराधा नक्षत्रावर घराघरांत वाजत-गाजत जल्लोषात ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात गौरींचे घरोघरी आगमन झाले असून कोळा पंचक्रोशीतील गौरीचे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले.
गणेशस्थापनेनंतर घरोघरी महालक्ष्मींचे आगमन झाले असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले असून. काल मंगळवारी संध्याकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये ज्येष्ठा व कनिष्ठा विराजमान होतात. यावेळी घरोघरी आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. ‘गौरी’ येणार म्हणून सकाळपासूनच लगबग सुरू होती. आठ दिवसांपासून घरात स्वच्छता आणि खरेदीत गृहिणी गुंतल्या होत्या. तर लहानथोरांचा सजावटीचा गलका अंगणातल्या तुळशीपासून देवघरापर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांच्या पायघड्या घालून त्यावर हळदी-कुंकू वाहण्यात आले होते.काही घरांत भांड्यांचा गजर करीत महालक्ष्मीचे आवाहन करण्यात आले, तर काही घरांत आपल्या लाडक्या लेकींच्या, ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींच्या भेटीनंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करून साखर वाटण्यात आली. आरतीनंतर कढी-खिचडीचा बेत झाला. माहेरवाशीण असलेल्या गौराईच्या आगमनानंतर घराघरांत नवचैतन्य निर्माण झाले होते.
गौरी आगमनावेळी बोलताना सौ भाग्यश्री भास्कर कुलकर्णी व सौ मंदाताई दिनकर कुलकर्णी म्हणाल्या गौरीला माहेरवाशीण म्हटले जाते. गौरीच्या रुपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते. गौरी आल्यानंंतर ती २ दिवस पाहुणचार घेते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचें आगमन झाल्यावर दुसर्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर सोमवारी गौरींचें पूजन होणार आहें. गौरी पूजनाची पद्धत, कुळाचारा प्रमाणे वेगवेगळी असते. तिसर्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन होणार आहे. मुखवट्याच्या, फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मुखवटे सजवुन पुजले जातात. सोमवारच्या पुजनाला सर्वाधीक महत्व आहे. ज्येष्ठा गौरींना रविवारी घरी तुळशी वृंदावनाजवळून सवाद्य आणले जाईल. लक्ष्मीप्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले असून. त्यानंतर त्यांना स्थानापन्न केलें जाते. त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जाईले.महालक्ष्मीचें मनोभावे पूजन करुन सायकाळी महाप्रसाद वाटला जाईल. १६ प्रकारच्या ऋतुकालोद्भव भाज्या बनवल्या जातात. त्यात मेथी, पडवळ, भेंडी, वांगी, घोसाळे, दोडके आदी भाज्यांचा समावेश असतो. या दिवशी प्रत्येक घरातील प्रथेनुसार एक, दोन, पाच, अकरा सुवासिनींना जेवण दिले जाते. पूजेतील केवड्याचा घरभर दरवळ उठतो हळदी-कुंकू करून त्यांची पाठवणी केली जाईल. भाज्या, खीर, गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवीला जाईल. शिवाय लाडू, चकल्या, करंजी असे विविध प्रकारचे फराळ, फळ यांचाही नैवेद्य दाखवण्यात येणार आहे.असे सौ सुनिता सुनिल कुलकर्णी यांनी सांगितले.