शैक्षणिक

13 वर्षानी एकत्र आले माजी विद्यार्थी ;जुन्या आठवणींना दिला उजाळा ; ज्ञानाच्या शिदोरीतून स्व-विकास आणि जन-विकास साधावा :- अशोक नवले

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि उत्तमोत्तम विद्यार्थी घडविण्याची परंपरा असणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्यूट येथील काशीबाई नवले अध्यापक विद्यालय येथे सन 2008-2010 साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यां मेळावा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. माजी विद्यार्थी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य एस के पाटील तर प्रमूख पाहूणे म्हणून सिंहगड इन्स्टिट्यूट चे डायरेक्ट अशोक नवले उपस्थित होते.

या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तर शालेय जीवनात घडलेल्या गमतीजमती ऐकताना सर्वजण भूतकाळात हरवून गेले होते.तसेच ज्यांना 2010 या वर्षात शैक्षणिक मार्गदर्शन केलेल्या आणि आज विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना पुन्हा भेटण्याची संधी मिळाल्याचा आणि त्यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टीमुळे विशेष आनंद झाल्याचे मत यावेळी बोलताना तत्कालीन शिक्षक लक्ष्मण काटे यांनी व्यक्त केले. सर्व शिक्षकवर्गाने माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर अनमोल असे मार्गदर्शनही केले.यावेळी सर्व सिंहगड इन्स्टिट्यूट तर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांना फेटा बांधून व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.माजी विद्यार्थी
गव्हाणे उज्वला,येलपले स्मिता,जरग प्रियंका,कोळवले अर्चना,सीमा बनकर,रतन ढोण. सागर शिवशरण, प्रमोद हिंगमीरे, विकास राऊत,दिनेश आलदर,बाळासाहेब सोनलकर,सुमित साळुंखे ,सचिन सोनलकर, अविनाश गर्डे,सचिन शिंदे,अवधूत वाघमोडे,देवानंद मिसाळ, विजयकुमार जुंदळे यांच्या सह आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सागर शिवशरण , बाळासाहेब सोनलकर , रतन ढोण यांनी विशेष प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्वला गव्हाणे यांनी तर आभार प्रदर्शन आर्चना कोळवले यांनी केले.

ज्ञानाच्या शिदोरीतून स्व-विकास आणि जन-विकास साधावा :- अशोक नवले

विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात स्वतःचे प्रसंगी सिंहगड इन्स्टिट्यूट चे नाव उज्वल करावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी हा शाळेचा आरसा असतो, विद्यार्थ्यामध्ये महाविद्यालयाचे प्रतिबिंब प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीतून स्व-विकास आणि जन-विकास साधला पाहिजे

– ————————–

विद्यार्थ्यांनी कुटुंब , समाज आणि राष्ट्र प्रगतीत आपले नाव कोरावे :- डॉ एस के पाटील ( प्राचार्य )

माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या नियोजनात आणि विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदल करण्याचे साधन असून शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा पाया रचला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुटुंब समाज आणि राष्ट्र प्रगतीत आपले नाव अधोरेखित केले पाहिजे पर्यायाने महाविद्यालयाचे नाव अधोरेखित होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!