सांगोला तालुका

कै.सरदार शामराव लिगाडे विद्यालयामध्ये तब्बल 29 वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

वासुद(वार्ताहर):-अकोला येथील रयत शिक्षण संस्थेच्या पटांगणामध्ये 29 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली होती. सर्व गुरुवर्य यांचे स्वागत हलगी ताशांच्या गजरामध्ये पुष्पवृष्टी करून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री.वि.खे.पाटील सर, मधुकर पवार, भगवान केदार, बबन मुलाणी, जाधवर सर, स्वामी सर, कदम सर, पांढरेमिसे सर व मुख्याध्यापक श्री.कांबळे सर उपस्थित होते.

प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व वहिनींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. शिक्षकांना भेट म्हणून घड्याळ, पैठणी साडी व ट्रॉफी देण्यात आली
त्यावेळीचे शिपाई हत्तेकर मामा यांनी दहा वाजून 45 मिनिटांनी शाळेची घंटा वाजविली त्यावेळीचे क्रीडा शिक्षक श्री.जाधवर सर यांनी सर्वांना ओळीत उभे करून राष्ट्रगीताची सुरुवात करून दहावीच्या वर्गामध्ये जाण्याचे सूचना केली.यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी हे सर्व एका ड्रेस कोड मध्ये होते. सर्वांनी आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला.
याप्रसंगी शालिनी सुखदेव शिंदे यांचा मुलगा तालुका कृषी अधिकारी झाला म्हणून विशेष सत्कार अकोला गावच्या सरपंच व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. प्रस्ताविक विजय लिगाडे सर यांनी, सूत्रसंचालन श्री.चंदनशिवे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.बाळासाहेब सावंत यांनी केले. यावेळी अशोक गव्हाणे, पुण्यवंत खटकाळे, नंदकुमार गव्हाणे, चारुशीला गव्हाणे, शालन शिंदे, मनीषा भसाळे, बाळासाहेब सावंत यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला शाळेमध्ये शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग आयुष्यात कसा झाला या विषयी मनोगत व्यक्त केले.

अरे तू कुठे आहेस, तू काय करतेस, तू लय मोठा झालास? कस काय चाललंय तुझं? तब्बल 29 वर्षानंतर 1994-95 सालातील वर्ग मित्रांच्या गप्पागोष्टी झाल्या.यावेळी मुले, मुली व वर्गशिक्षक गप्पागोष्टी चांगले रंगून गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!