सांगोला तालुका

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त १०३५ रक्तदात्यांचे रक्तदान

सांगोला (प्रतिनिधी):-रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व लायन्स क्लब प्रांत ३२३४ड१ माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब सांगोला आयोजित २० मे नाझरा,२१ मे कोळा,२२ मे लोणविरे व २३ मे सांगोला येथील भव्य रक्तदान शिबिरामध्ये १०३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाचे अनमोल कार्य केले.

२३ मे सांगोला येथील शिबिराच्या सुरुवातीला गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास विलासनाना क्षीरसागर व प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन सांगोला नगर परिषद मुख्याधिकारी सुधीर गवळी,ॲड.उदयबापू घोंगडे यांचे हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून झाले.यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य ॲड विजयसिंह चव्हाण, चंद्रशेखर अंकलगी,माजी नगराध्यक्ष सुहास होनराव,रेवनील ब्लड बँकेचे सोमेश यावलकर, प्राचार्य लक्ष्मण जांगळे, मुख्याध्यापक उदय बोत्रे, उपमुख्याध्यापक प्रा.गंगाधर घोंगडे , सांगोला लायन्स क्लब अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.

या शिबिरासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या संस्थेचे पदाधिकारी,विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी व सदस्य ,शहरातील विविध संस्था पदाधिकारी व सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानाच्या अनमोल कार्यास हातभार लावला.
या शिबिरासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला,सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.सूत्रसंचालन सचिव उन्मेश आटपाडीकर यांनी तर सांगोला विद्यामंदिर प्रशाला उपमुख्याध्यापक प्रा.गंगाधर घोंगडे यांनी आभार प्रदर्शन केले. समारोप कार्यक्रमामध्ये विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लबच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे व रक्तदानाचा महायज्ञ परिपूर्ण करण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे अंतःकरण पूर्वक आभार मानले.

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या विचारावर,तत्वावर,कार्यावर, लोकांचे अपार प्रेम असल्यामुळेच २३ मे त्यांचे वाढदिवसानिमित दरवर्षी शेकडो रक्तदाते रक्तसंकलनाचा महायज्ञ करतात .यावर्षी सांगोला येथे ६६० नाझरा येथे १६९, लोणविरे येथे १०४, कोळा येथे १०२ असे एकूण १०३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मानवतेच्या कल्याणकारी कार्यास हातभार लावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!