सांगोला तालुका
कोळा येथे दीपक आबा साळुंखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात एनसीसीच्या दुसऱ्या कॅम्पची सुरुवात..

३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील करमाळा मंगळवेढा माळशिरस अकलूज,वेळापूर, बार्शी कुर्डूवाडी सोलापूर अक्कलकोट पंढरपूर या भागातील एनसीसी विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राच्या कॅम्पचे सुरुवात झाली असून एनसीसी कॅम्पमुळे तरुणांना जगण्याची नवी ऊर्जा मिळत आहे असे प्रतिपादन सहाय्यक कर्नल विक्रम जाधव यांनी विचार व्यक्त केले..
कोळे ता सांगोला येथे डॉ. पतंगराव कदम शिक्षण संस्था संचलित दीपक आबा साळुंखे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण दुसऱ्या टीमच्या कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी कर्नल विक्रम जाधव बोलत होते. सर्व एनसीसीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना कर्नल विक्रम जाधव म्हणाले एनसीसी कॅम्प मध्ये महाविद्यालयीन आणि शालेय क्षेत्रांना जगण्याची नवी संधी मिळते
एन सी सी विविध प्रकारच्या गोष्टी कॅम्पमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना गोष्टी शिकून जातात ज्या आयुष्यभर आठवणीत राहतात त्यामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते ज्यामध्ये ड्रिल फायरिंग डेंट पिचिंग मॅप रीडिंग तसेच विविध खेळाच्या स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या जातात अशा शिबिरामधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे देशभक्तीची भावना निर्माण करणे अवघड परिस्थितीचा सामना करणे तसेच त्यांच्या सप्तगुणांना वाव देणे हा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये असे कॅम्प फार मोलाची भूमिका बजावतात मुले कुटुंबापासून काही दिवस दूर राहून स्वावलंबाचे धडे गिरवतात देशाचे सुजाण आणि सजग नागरिक घडविण्यामध्ये एनसीसी फार महत्त्वाची भूमिका पार पडत आहे अशा प्रकारच्या कॅम्पमधून विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाच्या कार्यपद्धतीचा जवळून अनुभव घेणे शक्य होते असे त्यांनी व्यक्त केले सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळामधून एनसीसी चे कॅन्डीडेट सहभागी झाले आहेत आता दहा दिवस मुक्काम या कॅम्पमध्ये राहणार आहे देशातील प्रत्येक पिढीने शिस्त पाळली पाहिजे, असे सांगून एनसीसीद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलात अधिकारी पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते असे त्यांनी सांगितले.
शिबिरासाठी कर्नल विक्रम जाधव, सुभेदार मेजर अरुणकुमार ठाकूर, सुभेदार प्रेमानंद,सुभेदार रामचंद्र, सतीश कुमार,रवींद्र सिंग,सप्तुला मंडल,हरकेश बनसल,सुदाम,मनीष कुमार,दिलीप कुमार दस,दीपक पाटील,नानासाहेब साठे,चेतन सावंत १३ निर्देशक प्रामुख्याने उपस्थित होते. शिबीर यशस्वी होण्यासाठी डॉ. पतंगराव कदम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक माने, पत्रकार जगदिश कुलकर्णी,सचिव अमोल माने, संचालक शरद माने मार्गदर्शक बाळासाहेब करांडे,यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी संपूर्ण सहकार्य करत आहेत.तरुणांना चांगली संधी उपलब्ध कोळ्यासारख्या ग्रामीण भागात जिल्हा स्तरावरील एनसीसी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.