सांगोला तालुका
शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दोन दुकाने भस्मसात ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून माणुसकीचे दर्शन

जवळा ता.सांगोला येथील इनामदार कॉम्प्लेक्समधे बँगल्सचा व्यवसाय चालवून आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत असलेल्या शाहरन चांद आत्तार आणि गफुर नदाफ यांच्या स्वीट मार्ट अशा दोन दुकानास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दोन्ही दुकानातील हजारो रुपयांचे साहित्य जळून भस्मसात झाले. जवळा परिसर आणि सांगोला तालुक्यातील प्रत्येक दुःखी आणि पिडीत कुटुंबीयांचे अश्रू पुसण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन अत्यंत गरिबीतून स्वतःचा व्यवसाय चालवणाऱ्या आत्तार परिवाराला आधार देत त्यांना २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली.
मंगळवार दि २३ रोजी सायं ७.३० वा. अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे इनामदार कॉम्प्लेक्समध्ये शाहरन चांद आत्तार यांच्या रेहाना बँगल्स आणि स्टेशनरी तसेच गप्पूर नदाफ यांचे महम्मदीया स्वीट मॉल या दोन दुकानास आग लागली. यामध्ये आत्तार यांच्या दुकानातील बांगड्या आणि अन्य स्टेशनरीचे साहित्य जळून भस्मसात झाल्याने आत्तार परिवाराचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. तर नदाफ यांचेही या शॉर्ट सर्किटमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शाहरन चांद आत्तार इनामदार कॉम्प्लेक्समध्ये अनेक वर्षापासून व्यवसाय चालवत होत्या. दरम्यान अचानक दुकानास आग लागून प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने आत्तार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता ज्या दुकानावर संपूर्ण परिवाराचा चरितार्थ सुरू होता तेच जळून गेल्याने आता काय करायचे..? हा प्रश्न संपूर्ण परिवाराला सतावत होता. याचवेळी नेहमी दुःखी पिडीत लोकांचे अश्रू पुसून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे असणारे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बुधवार दि २४ रोजी सकाळी जळालेल्या दोन्ही दुकानाची पाहणी केली आणि आत्तार परिवाराला धीर देत पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. यावेळी जमीर बागवान, लतीफ नदाफ, पैगंबर नदाफ, समीर नदाफ, मैनू खलिफा, आफताब (पप्पू) इनामदार, सिकंदर (भाऊसाहेब) इनामदार, उपसरपंच नवाज खलिफा, गफूर नदाफ, पोलीस पाटील अतुल गयाळी, बाबासाहेब इमडे, इलायत खलिफा, साहिल इनामदार, सचिन सिंदकर, दीपक कांबळे व विकास मागाडे आदीसह मुस्लिम समाजातील बहुसंख्य तरुण उपस्थित होते.
- जवळा परिसर आणि संपूर्ण सांगोला तालुका हा आपला परिवार आहे. परिवारातील प्रत्येक सदस्यांची आपण ज्या पद्धतीने काळजी घेतो त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतो. त्याच पद्धतीने जवळा येथील आत्तार परिवाराचे अश्रू पुसण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हा संस्कार आणि आदर्श आपणास संपूर्ण गावाची मातेप्रमाने काळजी घेणाऱ्या ह.भ.प. स्व. शारदादेवी साळुंखे पाटील (आई) यांनी दिला आहे.आपल्या मदतीने एका कुटुंबाचा संसार पुन्हा उभा राहणार असेल तर यासारखे समाधान नाही ;
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील