सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत सुयश

सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे बोर्डाकडून फेब्रु/मार्च,२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल काल गुरूवार दि.२५ मे,२०२३ रोजी आँनलाईन जाहीर झाला.सदर परीक्षेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील इ.१२ वी कला,वाणिज्य व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. यामध्ये कला शाखेचा निकाल ९४.३५%, वाणिज्य शाखेचा निकाल ९९.१६ % तर शास्त्र शाखेचा निकाल ९७.५५% लागला असून या निकालाबद्दल संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील कला शाखेतून कुमारी ढोबळे वैष्णवी वैभव (५२९/६००) ८८.१७% मिळवून प्रथम क्रमांक,कुमारी दिक्षित सानिका सिताराम (४७९/६००) ७९.८३% मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी माळी पूर्वा विकास (४७६/६००) ७९.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेतून कुमारी दिक्षीत सायली दत्तात्रय (५५१/६००) ९१.८३% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कुमारी हजारे स्वाती दगडू (५३३/६००) ८८.८३% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी सुरवसे त्रिभुवनी संतोष (५३०/६००) ८८.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला तर शास्त्र शाखेतून कुमारी निमंग्रे स्नेहल प्रकाश (५०५/६००) ८४.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कुमार बनकर योगीराज राजाराम (५०२/६००) ८३.६७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी शिंदे प्रणाली रावसाहेब (४८८/६००) ८१.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,सचिव म. शं. घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य, प्राचार्य लक्ष्मण जांगळे, उपमुख्याध्यापक प्रा.गंगाधर घोंगडे,उपप्राचार्य प्रा.लक्ष्मण विधाते,पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सदर निकाल जाहीर झाल्यानंतर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे सचिव म.शं घोंगडे प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांचे हस्ते व उपमुख्याध्यापक प्रा.गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य प्रा.लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक अजय बारबोले ,पोपट केदार , प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिनंदन पत्र देऊन त्यांचा पालकांसमवेत सत्कार केला.व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या सत्काराबद्दल पालकांनी संस्था, शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.