सांगोला तालुका

बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदाही कायम;

सांगोला तालुका शेतकरी सह.सूतगिरणी मर्या सांगोला

सांगोला(प्रतिनिधी):-शेतकरी सह.सूतगिरणी मर्या सांगोला संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून स्व.गणपतराव देशमुख यांनी सुरु केलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदाही शेतकरी कामगार पक्षाकडून कायम राहिली आहे.
या संस्थेच्या सन 2022 ते 2027 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध करण्यात आली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 17 जागेसाठी 56 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 17 उमेदवार ठेवून बाकीच्या 39 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
सूतगिरणीच्या स्थापनेपासून सूतगिरणीची निवडणूक झालेली नाही. निवडणुकीतून अंतर्गत वाद निर्माण होतात. पैशाचादेखील मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. निवडणुकीतील वादविवाद वर्षानुवर्षे राहतात. परिणामी सलोखा राहत नाही. यासाठी स्व.भाई गणपतराव देशमुख यांनी पूर्वीपासूनच बिनविरोधची परंपरा कायम राखली आहे. ती यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय देशमुख कुटुंबियांकडून व ज्येष्ठ मंडळीकडून घेण्यात आला.स्व.भाई गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या हयातीत सुरू ठेवलेली बिनविरोधची परंपरा अबाधित ठेवण्यात शेतकरी कामगार पक्षाला यश आले आहे.

नूतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे:-
कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघ
श्री.चंद्रकांत गणपतराव देशमुख (सांगोला)
श्री.अण्णासाहेब गणपतराव देशमुख (सांगोला)
श्री.संतोष शांताराम पाटील (महूद)
श्री.नितीन कृष्णा गव्हाणे (कडलास)
श्री.भारत हणमंत बंडगर (अनकढाळ)
श्री.बाबासो रामचंद्र करांडे (लोटेवाडी)
श्री.विश्वंभर नारायण काशीद (पंढरपूर)

बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघ
इंजि.मधुकर विठ्ठल कांबळे (सांगोला)
श्री.अंकुश लक्ष्मण बागल (खिलारवाडी)
श्री.विक्रांत महादेव गायकवाड (कडलास)
श्री.दिलीप शिवाजी देशमुख (कोळे)

संस्था प्रतिनिधी मतदार संघ
श्री.सागर भगवान लवटे (लोटेवाडी)

अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
श्री.बाळासाहेब संदिपान बनसोडे (सांगोला)

महिला राखीव मतदार संघ
सौ.ताई शिवाजी मिसाळ (पाचेगाव)
सौ. सीतादेवी सुनील चौगुले (गुंजेगाव ता.मंगळवेढा)

इतर मागासवर्गीय मतदार संघ
श्री.प्रभाकर एकनाथ माळी (सांगोला)

वि.जा/ भ.ज./वि.मा.प्र.मतदार संघ
श्री.कुंडलिक पंढरी आलदर (कोळे)

वरील उमेदवार सुतगिरणीच्या व्यवस्थापन समितीच्या त्या त्या जागावर निवडुन आले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी चंद्रकांत टिकुळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!