सांगोला तालुका
स. शा. लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे (ज्यु) कॉलेजच्या १००% निकालाची परंपरा कायम
अकोला:- स. शा. लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे (ज्यु) कॉलेज (कृषी) कॉलेजचा निकाल आज जाहीर झाला असून ज्युनियर कॉलेजचा १००% निकाल लागला आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक केदार योगीता मारुती 77% गुण मिळविले आहेत. तसेच द्वितीय क्रमांक भोसले अमृता राजेंद्र 76.67 % तसेच तृतीय क्रमांक स्वरांजली बापुसाहेब सावंत 76%, बाबर आकांक्षा काकासो 76%, सावंत विश्वजीत विजय 76% असे गुण मिळविले आहेत. सर्व यशस्वी विदयार्थ्याचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा. नानासाहेब लिगाडे, विदयालयाचे प्राचार्य बी. जे. कांबळे, पर्यवेक्षक पी.व्ही. पवार, स्कुल कमिटी सदस्य प्रा. आनंदराव खटकाळे, एम.डी.शिंदे, विलास लिगाडे,सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.पं. सदस्य, यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.