सांगोला तालुका

तिप्पेहळी येथे नव्याने भरती झालेल्या होतकरू युवकांचा गौरव सोहळा संपन्न; रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्ट व परिवर्तन मंचचा उपक्रम

सांगोला तालुक्यातील तिप्पेहळी येथील विविध क्षेत्रात,  यामध्ये भुमिअभिलेख नेव्ही, महाराष्ट्र पोलीस व एमएसएफ सिक्युरिटी फोर्स,  अंगणवाडी सेविका इत्यादी शेत्रामध्ये जिद्दीने  यश संपादन केलेले व भरती झालेले यांचा रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्ट व परिवर्तन युवा मंच व ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व फेटा देऊन नागरी सत्कार व गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व नेतेमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भरती झालेले मुंबई भूमी अभिलेख मध्ये शंकर अरुण बजबळकर, नेव्ही मध्ये सुशांत भीमराव बजबळकर, पोलीस पदी अनुक्रमे विक्रांत सुखदेव नरळे, सुभाष श्रीमंत बजबळकर, हनुमंत ईश्वर आटपाडकर, पोलीस चालक पदी चंद्रकांत दामू बजबळकर, महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफ मध्ये सागर महादेव नरळे, रोहित महादेव नरळे, मनोहर धोंडीराम नरळे, हनुमंत नरळे, रमेश महादेव नरळे भाऊ, सतिश भिमराव नरळे, ऋषिकेश गोरख बजबळकर,
चंद्रकांत मोहिते, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका पदी अनिता हनुमंत बजबळकर, सुवर्णा विष्णू नरळे यांनी नव्याने भरती किंवा यश मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना उद्योगपती अशोकराव नरळे म्हणाले, गावातील तरुण युवकांनी गावमध्ये यश संपादन करणेकामी सोयी सुविधा नसताना नेत्रदीपक यश मिळवल्याने आनंद झाला आहे आणि या तरुण वर्गामुळे गावामध्ये प्रेरणा आणि उस्ताह निर्माण झाला आहे. पुढे बोलताना अशोक आबा फलटणे म्हणाले की पोलिस दलामध्ये काम करताना सर्वसामान्य, गरजू लोकांना मदत करणेची नामी संधी मिळते आणि तरुण वर्गाने जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करावे. तसेच परीवर्तन मंच कायमच होतकरू तरुण वर्गाला उर्जा देणेचे काम करतात असे सांगितले.
विष्णु सांगोलकर म्हणाले यांनी कोणत्याही अमिष्याला बळी न पडता काम करावे असा कानमंत्र दिला.विश्वनाथ सांगोलकर यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमास माजी सरपंच आणि विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब ( दादा) नरळे- फलटणे, सरपंच अरुण बापू बजबळकर, पत्रकार जगदीश कुलकर्णी, मा डेयरी मॅनेजर पांडुरंग नरळे, विलास नरळे, मा सरपंच पांडुरंग तात्या नरळे, प्रगतशील बागायतदार श्रीमंत अण्णा बजबळकर , भगवान नरळे वस्ताद इंजि. अशोक नरळे- फलटणे, विष्णू सांगोलकर- अभियंता, भिमराव नरळे मेजर, विशाल नरळे (मा.सरपंच) मारुती नरळे मेजर, हनुमंत मोहिते मेजर, राजू करांडे- पोलीस पाटील, विश्वनाथ सांगोलकर सर, तानाजी बापू. नरळे, प्रकाश माने, सुनील मोहिते-  मा. उपसरपंच, शिवाजी नरळे- फलटणे, दरी बजबळकर- मेजर, संतोष नरळे ,अशोक करांडे बीएमसी, नवनाथ तात्या नरळे, मा उपसरपंच लक्ष्मण नरळे, चोपदार सचिन नरळे व सर्व परिवर्तन मंच सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  परिवर्तन युवा मंचचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ सांगोलकर सर्वांचे आभार इंजिनिअर उद्योगपती अशोक आबा नरळे यांनी मांनले.
भरती साठी प्रयत्न करणाऱ्या तरुण वर्गाला व्यायाम करणेकामी ग्रामस्त यांचे मदतीने सोयी सुविधा  उपलब्ध करुन देणेचा प्रयत्न करू अशी ग्वाही रामा फलटणे ट्रस्ट चे अध्यक्ष इंडियन उद्योगपती अशोकराव नरळे यांनी आश्वासन दिले .
One attachment • Scanned by Gmail

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!