सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर ज्युनि. कॉलेजची सायली दिक्षीत एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत सांगोला तालुक्यात प्रथम

सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे बोर्डाकडून फेब्रु/मार्च,२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल गुरूवार दि.२५ मे,२०२३ रोजी आँनलाईन जाहीर झाला.सदर परीक्षेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील इ.१२ वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी कुमारी दिक्षीत सायली दत्तात्रय हिने (५५१/६००) ९१.८३% गुण मिळवून सांगोला तालुक्यातून सर्वच शाखेतून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला,तसेच बुक कीपिंग अँड अकौटन्सी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने यश संपादन केले,त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.तिला वाणिज्य शाखेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म.शं.घोंगडे ,प्राचार्य लक्ष्मण जांगळे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तिचा पालकासमवेत सत्कार करण्यात आला.
सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव म.शं.घोंगडे,सहसचिव प्रशुध्दचंद्र झपके,खजिनदार शंकरराव सावंत,सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य,प्राचार्य लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य लक्ष्मण विधाते, उपमुख्याध्यापक गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले,पोपट केदार,बिभिषण माने,प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

माझ्या या यशात आई- वडीलांचा व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. गुणवंत (टॉपर) विद्यार्थी योजनेमुळे मी सतत अभ्यासाच्या प्रवाहात राहिले.पुणे येथे जाऊन उच्च शिक्षण घेत सनदी लेखापाल ( सी.ए.) अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा मानस आहे.
– कु.सायली दिक्षीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!