सांगोला तालुकाशैक्षणिक

नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा कला विज्ञान व शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्के

नाझरा (वार्ताहर) :- फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे. विशेष बाब म्हणजे कला वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून तिन्ही शाखेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांमध्ये मुलींनीच नंबर पटकावले आहेत.कला शाखेतील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे कुमारी- शेळके सारिका संजय ७९.५०%,कुमारी. बाबर रिया विजय ७८.६७ %कुमारी. सोनवणे श्रद्धा महादेव ७७.६७ % ,शास्त्र शाखेतील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे कुमारी.बाबर रेवती संग्राम ७८.१७%,कुमारी. बंडगर अश्विनी अनिल ७७.८३%,कुमारी मिसाळ गायत्री रामहरी ७५.८३% तर वाणिज्य शाखेतील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे कुमारी. जावीर प्रतीक्षा दत्तात्रय ७२.८३ %, कुमारी. कोरे अनुराधा महादेव ७२.६७ %, कुमारी मिसाळ सीमा विष्णू ६९.६७ % असे गुणवंत विद्यार्थी असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्राचार्य अमोल गायकवाड व सहकारी शिक्षकांनी विद्यार्थिनींचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारणी सदस्य,प्राचार्य अमोल गायकवाड पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!