सांगोला तालुका

वृक्ष तुमचे ; जबाबदारी आमची या संकल्पनेची सुरुवात महूद येथे कासाळगंगा नदीच्या परिसरामध्ये वृक्षारोपण

 येथील नॅशनल वॉटर अवॉर्ड विजेत्या कासाळगंगा नदीच्या परिसरामध्ये लोकसहभागातून वृक्ष लागवड करून आनंदवन विकसित करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.वृक्ष तुमचे ; जबाबदारी आमची या संकल्पनेची सुरुवात आज महूद येथे नदीपात्राच्या कडेला वृक्षारोपण करून करण्यात आली.
महूद येथील कासाळगंगा नदीमध्ये असलेल्या कासाळेश्वर मंदिर परिसरात लोकसहभागातून वृक्ष लागवड करून आनंदवन विकसित करण्याचा संकल्प येथील तरुणांनी केला आहे.या अंतर्गत नदीपात्राच्या दोन्ही तीरावरती वड,पिंपळ,बेल आदी पारंपारिक रोपांची लागवड करण्यात येणार आहे.यासाठी ग्रामस्थांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृती पित्यर्थ किंवा लाडक्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त रोप आणि रोपासाठी संरक्षक जाळी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेचा शुभारंभ आज पुणे येथील देसाई ब्रदर्स  लिमिटेड च्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचे प्रमुख निवृत्त प्राचार्य डॉ.चंद्रकांत रावळ, सामाजिक उत्तरदायित्व निधीचे अधिकारी निलेश गुजराथी,अभय दिवाणजी,राहुल गरड,राम गावडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच संजीवनी लुबाळ,  माजी उपसरपंच दिलीप नागणे,वर्षा महाजन,ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर येडगे,यशवंत खबाले,दीपक धोकटे,संदीप बाबर, गुरु कुंभार,तानाजी भानवसे आदी उपस्थित होते.
वृक्ष तुमचे ; जबाबदारी आमची
येथील कासाळेश्वर मंदिर परिसरामध्ये श्री सदस्यांच्या सहयोगातून नदी पात्राच्या दोन्ही तीरावरती पारंपारिक जातीच्या वृक्षांची लागवड लोकसहभागातून करण्यात येत आहे. हा परिसर हिरवागार बनवण्यात येणार आहे.यासाठी प्रियजनांच्या  स्मृतीप्रित्यर्थ  किंवा लाडक्याच्या वाढदिवसानिमित्त रोप आणि संरक्षण जाळी घेण्यात येणार आहे.या रोपाची लागवड करून ती जोपासण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. पुढच्या पिढीला एक निसर्ग संपन्न वारसा देण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.-
दीपक धोकटे, सुहास बाजारे, चंद्रशेखर ताटे, प्रभाकर कांबळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!