सांगोला तालुका
कोळे गावात एनसीसी कडून घुमला पर्यावरण संवर्धनाचा संदेश….

सांगोला तालुक्यातील कोळा येथील दीपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज अँड महाविद्यालय कोळे या ठिकाणी ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरच्या वतीने प्रभारी कर्नल विक्रम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वार्षिक सर्वसाधारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरा अंतर्गत पर्यावरण कोळा गावातील एसटी स्टँड चौकातून अर्जुन चौक लक्ष्मी चौक निर्वाण चौक ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत संवर्धन व पर्यावरण व्यवस्थापनाचे महत्त्व वृक्षारोपणाचे महत्व स्वच्छता संदेश चे महत्व असे एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रॅली काढली.
ग्रामीण भागात जिल्ह्यातून आलेल्या विविध भागातील ४०० विद्यार्थ्यांनी दिले वाढते तापमान वृक्षतोड या गोष्टी सतत भेडसावत आहेत या संदर्भात गावामध्ये जनजागृती व्हावी व वृक्षारोपणाचे पर्यावरण संवर्धनाचे महत्व लोकांना समजावे म्हणून गावामध्ये रॅली काढून व चौका चौकामध्ये पथनाट्य करून वृक्षारोपण संवर्धनाच्या संदेश दिला.३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कर्नल विक्रम जाधव, सुभेदार अरुणकुमार ठाकूर, सुभेदार प्रेमानंद,सुभेदार रामचंद्र, सतीश कुमार,रवींद्र सिंग,सप्तुला मंडल,हरकेश बनसल,सुदाम,मनीष कुमार,दिलीप कुमार दस,दीपक पाटील,नानासाहेब साठे,चेतन सावंत त्याच प्रमाणे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट नंदकुमार गायकवाड, लेफ्टनंट समाधान माने, सेकंड ऑफिसर मकरंद अंकलगी, सी टी ओ अंकुश कांबळे , सी टी ओ नर्गिस इनामदार, ट्रेनिंग जेसीओ सुभेदार प्रेमानंद, सुभेदार अण्णाराव वाघमारे, व इतर एनसीसी सहाय्यक अधिकारी उपस्थित होते.
एनसीसीच्या वतीने आयोजित केलेल्या संदेश रॅली यशस्वी होण्यासाठी डॉ. पतंगराव कदम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक माने, पत्रकार जगदिश कुलकर्णी,सचिव अमोल माने, संचालक शरद माने मार्गदर्शक बाळासाहेब करांडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एनसीसीचे सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी संपूर्ण सहकार्य करत आहेत.