सांगोला तालुकाशैक्षणिक

कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील विद्यालय हंगिरगे येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन व एन एम एम एस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील विद्यालय हंगिरगे येथे शुक्रवार दिनांक 26 /5 /2023 रोजी आठवी ते दहावीतील मुलांना डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मोफत संगणक प्रशिक्षण उद्घाटन पालक प्रतिनिधी श्री बंडोपंत लांडगे व श्री रघुनाथ गुजले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर श्री बंडोपंत लांडगे, श्री. रघुनाथ गुजले( नरवीर उमाजी राजे नाईक समाज सुधारक मंडळ सांगोला तालुका अध्यक्ष), संस्था संचालक डॉ. शिंदे, मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर ,संगणक प्रशिक्षक श्री गुजले सर, एन एम एम एस मार्गदर्शक श्री विकास शिंदे सर उपस्थित होते. प्रथमता सर्व मान्यवरांचा  फेटा, पुष्पहार, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उद्घाटक श्री. बंडोपंत लांडगे म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी संगणक ही काळाची गरज आहे .शालेय जीवनात मिळालेले संगणक प्रशिक्षण हे ऑनलाईन स्पर्धा परीक्षांसाठी खूप फायदेशीर होते. प्रशालेने सुरू केलेला हा नवीन उपक्रम खूप कौतुकास्पद आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.मार्गदर्शक म्हणून देशभक्त संभाजीराव शेंडे हायस्कूल मेडशिंगी चे श्री .विकास शिंदे सर लाभले.
शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले की एन एम एम एस स्पर्धा परीक्षा मेरिट मध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करावा .अनेक उदाहरणादाखल त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले की एन एम एम एस परीक्षा ही अभ्यासामध्ये वारंवारता ठेवली तर खूप सोपी आहे .तुम्ही जिद्द चिकाटी व अभ्यासाची वारंवारता ठेवा, यश तुम्हाला हमखास मिळेल. तसेच त्यांनी एन एम एम एस परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी  कोणकोणती पुस्तके वापरावी हे देखील सांगितले.. आपले अध्यक्षीय भाषणात बोलताना संचालक डॉक्टर शिंदे म्हणाले की प्रशालेच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी संस्था व प्रशाला कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच संस्थेचे, शिक्षकांचे ध्येय आहे इथून पुढे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविले जातील. यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. क्षिरसागर सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. जाधव सर व आभार प्रदर्शन श्री धनाजी चव्हाण सर यांनी केले.. कार्यक्रमासाठी संस्था संचालक डॉ. शिंदे ,मुख्याध्यापक क्षीरसागर सर पालक प्रतिनिधी श्री .बंडोपंत लांडगे, श्री लांडगे साहेब श्री. रघुनाथ गुजले, संगणक प्रशिक्षक अनिल गुजले सर ,श्री चव्हाण सर श्री जाधव सर ,भंडे सर, शिंदे मॅडम, सावंत मॅडम, वाघमारे सर, सावंत सर ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते… या नवीन अशा शालेय उपयोगी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!