हंगिरगे येथील मायाक्का देवी मंदिरास भाविकांच्या वतीने माईक, तुतारी, मंडप सेट व इलेक्ट्रीक घड्याळ
हंगिरगे(वार्ताहर):-हंगिरगे गावातील नवीनच झालेल्या मायाक्का देवी मंदिरास सावंत वस्ती येथील श्री.वेताळ हरिबा सावंत तसेच त्यांचा मुलगा मेजर दीपक वेताळ सावंत व उषाताई वेताळ सावंत यांनी मायाक्का देवीच्या नवीन मंदिरास माईक, तुतारी व मंडप सेट असा सर्व सेट अर्पण केला.जानवी स्वयंसेवक गट हंगिरगे यांच्यामार्फत मायाका देवी मंदिर इलेक्ट्रिक घड्याळ अर्पण केले.
यावेळी सावंत वस्ती येथील बचत गटातील सर्व महिला तसेच भक्तगण यांच्यासह बचत गटातील अध्यक्ष ललिता मिसाळ ,नंदा साबळे, नंदा सावंत ,रेखा सावंत , उषा सावंत, शारदाबाई सावंत ,सरूबाई सावंत, सुलोचना सावंत, मनीषा सावंत ,सिंधुबाई मिसाळ , तसेच सावंत वस्तीवरील हर्षद सावंत, रोहित मिसाळ, बाळासाहेब सावंत, शशिकांत सावंत, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुग्रेशन सावंत, राजू सावंत, सचिन सावंत, वसंत मिसाळ, बाबू मिसाळ, मयूर मिसाळ आदी उपस्थित होते.
हंगिरगे गावातील सावंत वस्ती मायाक्का देवी मंदिरात भक्तगण यांचा चांगलाच प्रतिसाद असून देवांचे आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी असल्याचे भाविक भक्तांमधून बोलले जात आहे.