कचरामुक्त अभियान अंतर्गत जि प शाळा मेडशिंगी येथे संपूर्ण स्वच्छता

मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सोलापूर यांचे आदेशानुसार ग्राम पंचायत मेडशिंगी यांचेकडून कचरामुक्त अभियान अंतर्गत कामाचा धडाका सुरू झाला असून उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी ग्राम पंचायत हद्दीत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. व हद्दीतील शाळा, मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणे, यांची स्वच्छता करून घेणेत आली. यामध्ये जि प शाळा मेडशिंगी येथे शाळा परिसर व पटांगण स्वच्छता करणेत आली.
सदरचे कामकाज सुरू असताना सरपंच सौ उमाताई इंगवले, उपसरपंच श्री अमर गोडसे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर , मार्गदर्शक श्री प्रताप इंगवले सर, श्री प्रभाकर कांबळे साहेब, श्री रामलिंग झाडबुके, श्री रमेश रूपनर ग्राम विकास अधिकारी श्री बनसोडे भाऊसाहेब यांचेसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कचरामुक्त अभियानाचे गावातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे